जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…त्यांना घाबरून तो गाडी सोडून पळाला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)देशात व जगभरातच कोरोना विषाणूची मोठी दहशत माजली असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस व आरोग्य विभाग डोळ्यात तेल घालून काम करत आहे तर काही विघ्नसंतोषी तरुण मात्र त्याकडे कान डोळा करत आहेत.त्यांना पोलीस आपल्या काठीने ठिकाणावर आणत आहेत. कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव तालुका पोलीस आपल्या गस्तीवर असताना त्यांना असाच अनुभव आला असून एक तरुण विका क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन प्लस या गाडीवर हुंदडत असताना पोलिसांच्या नजरेत आला त्याला पोलिसानी थांबण्याचा इशारा करताच घाबरलेल्या या बहाद्दराने पोलिसांच्या माराच्या धाकाने चक्क आपली दुचाकी सोडूनच पळ काढला असून कोपरगाव तालुका पोलिसानी ती गाडी जप्त करून अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत कोपरगाव तालुका पोलीस आपल्या कार्यक्षेत्रातील गावात डोळ्यात तेल घालून हि साथ पसरणार नाही यासाठी प्रयत्न करत असताना काही विदूषक मंडळी त्यांच्या या प्रयत्नांना आपले नाक कापून अपशकुन करताना दिसत आहे.त्याचेच मासलेवाईक उदाहरण कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत घडला असून कोपरगाव तालुका पोलीस रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या गस्तीवर असताना त्यांना एक तरुण आपल्या वरील कंपनीच्या दुचाकीवर टाळेबंदीचा आदेश तोडून जात असताना दिसला त्याला पोलिसानी थांबण्याचा इशारा करताच हा भांबावला व त्याने आहे त्याच ठिकाणी आपली दुचाकी थांबवत पोलिसांच्या लाठीभयाने पोबारा केला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ९ हजार २४० इतकी झाली असून ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती संख्या १ हजार ९८२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १५० जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही काही शहरे व खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत आसताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदर नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी आमंत्रण देत आहे.या बाबत कोपरगाव तालुका पोलीस आपल्या कार्यक्षेत्रातील गावात डोळ्यात तेल घालून हि साथ पसरणार नाही यासाठी प्रयत्न करत असताना काही विदूषक मंडळी त्यांच्या या प्रयत्नांना आपले नाक कापून अपशकुन करताना दिसत आहे.त्याचेच मासलेवाईक उदाहरण कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत घडला असून कोपरगाव तालुका पोलीस रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या गस्तीवर असताना त्यांना एक तरुण आपल्या वरील कंपनीच्या दुचाकीवर टाळेबंदीचा आदेश तोडून जात असताना दिसला त्याला पोलिसानी थांबण्याचा इशारा करताच हा भांबावला व त्याने आहे त्याच ठिकाणी आपली दुचाकी थांबवत पोलिसांच्या लाठीभयाने पोबारा केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close