जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या शहरात आता तरी घोळके बंद करा-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील काही प्रभागातील अनेक तरुण घराबाहेर येऊन घोळक्या घोळक्याने थांबलेले आढळतात.आता तर कोरोनाचा रुग्ण कोपरगावात आढळला असल्याने सर्वांनाच धोका वाढलेला आहे.त्यामुळे आता तरी शहरातील घोळके बंद करावे असे कळकळीचे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ९ हजार २४० इतकी झाली असून ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती संख्या १ हजार ९८२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १५० जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही काही शहरे व खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ९ हजार २४० इतकी झाली असून ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती संख्या १ हजार ९८२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १५० जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही काही शहरे व खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,नगरपरिषद,तहसील कार्यालय,पोलीस विभाग यांचे अधिकारी,कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून नागरिकांच्याच हितासाठी प्रयत्न करत आहेत.तरीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता काहीजण प्रशासनालाच वेठीस धरत आहेत.नुकतेच रात्री आपण स्वतः अधिकाऱ्यांसह काही भागात गेलो असता गस्त पथकाला पाहील्यानंतर गल्लीतील तरुण बाजूला निघून गेले व काही वेळाने पुन्हा गर्दि करून गप्पात रंगले.अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क किंवा कपडाही नव्हता.नागरिकच जर असे निष्काळजीपणा करून कोरोनाला निमंत्रणच देणार असतील तर कोरोनाला रोखणे कठिण होणार आहे.म्हणूनच संचारबंदीच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये,चेहऱ्यावर मास्क-कपडा लावावा.आपण प्रशासनाला सहकार्य केले नाहीतर, नाईलाजाने शहरात राज्य राखीव पोलीस दल किंवा लष्कराचे जवान ही दाखल होऊ शकतात याचे सूतोवाच अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close