कोपरगाव तालुका
…या कंपनीकडून वारीत धान्य वाटप संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील रासायनिक कारखान्यात अग्रभागी असलेल्या गोदावरी बायोरिफायनरी ली.साकरवाडी कडून वारी गावातील गरजू कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आले सध्या कोरोनाने संपूर्ण जगावर संकट ओढून आले असून बऱ्याच लोकांना रोजगार नसल्याने ते घरीअसल्याने एक मदतीचा हात म्हणून सोमय्या परिवारा कडून वारी गावातील जवळपास १ हजार कुटुंबाला ३ किलो तांदूळ १ किलो तूरडाळ अर्धा किलो गोडेतेल पॅकिंग करून वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान ग्रामस्थांना धान्य कमी पडल्यास अतिरिक्त धान्य पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन मुख्य संचालक एस.मोहन यांनी दिले आहे. या वाटपाचे वेळी सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात आला आहे.सर्व वाटप ग्रामपंचायत सदस्यच्या उपस्थित प्रभागात जाऊन घरो घरी करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे मुख्य संचालक एस. मोहन, समूह व्यवस्थापक अनिल कुमार,कामगार अधिकारी मधुकर दराडे,सुरक्षा अधिकारी संजय सरोदे,बांधकाम अधिकारी सौदागर कुलाल,फकीर टेके,वाल्मिक जाधव सह वारी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व प्रमुख नागरिक उपस्थित होते.