शैक्षणिक
रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर…या दोघांची निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सातारा येथील रयत संस्थेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी,पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप गोरखनाथ वर्षे यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे.तर सेवानिवृत शिक्षक सुरेश बोळींज यांचीही निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ॲड.संदीप वर्पे हे कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व.गोरक्षनाथ कर्पे यांचे सुपुत्र आहेत.या शिवाय त्यांच्या मातोश्री या प्राध्यापिका होत्या.ज्या महाविद्यालयात त्या अध्यापनाचे कर्तव्य करत होत्या त्याच महाविद्यालयात त्यांच्या मुलाची निवड होणे हा योगायोग मानला जात असून विशेष क्षण मानला जात आहे.
रयत शिक्षण संस्था,सातारा ही आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.तिची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ रोजी शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती.ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता आणि आजही आहे.या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात आणि इतर राज्यांतही पूर्व-प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,उच्च शिक्षण आणि वसतिगृहांचे मोठे जाळे कार्यरत आहे.त्या संस्थेवर निवड होणे गौरवाचे मानले जाते.याच शिक्षण संस्थेची व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे.या बैठकीत सन-2026 ते 2029 या कालावधीसाठी माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.तर याच बैठकीत कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले ॲड.संदीप वर्पे यांची संस्थेच्या सर्वोच्च शिखर समितीवर निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील सेवानिवृत शिक्षक सुरेश बोळींज यांचीही रयत शिक्षण संस्थेने दखल घेतली असून त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ॲड.संदीप वर्पे हे कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व.गोरक्षनाथ कर्पे यांचे सुपुत्र आहेत.या शिवाय त्यांच्या मातोश्री या प्राध्यापिका होत्या.ज्या महाविद्यालयात त्या अध्यापनाचे कर्तव्य करत होत्या त्याच महाविद्यालयात त्यांच्या मुलाची निवड होणे हा योगायोग मानला जात असून विशेष क्षण मानला जात आहे.ते राष्ट्रवादी फुटण्याच्या आधी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जात आहे.त्यांची पूर्वी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांची प्रदेश सचिवपदी निवड केली होती.मात्र त्यावेळी अनेक प्रस्थापितांना ती मानली नव्हती.कोपरगाव नगर परिषदेत त्यांनी नगरसेवक असताना अनेक प्रश्नांना अभ्यासूपणे वाचा फोडली होती.आता रयत सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आता कोपरगावच्या नेतृत्वाचा सहभाग असणार आहे.ही बाब कोपरगाव शहरासाठी अत्यंत गौरवास्पद मानली जात आहे.या निवडीबद्दल राजकीय,शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ॲड.संदीप वर्पे सर्वत्र अभिनंदन होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी वर्पे यांच्यावर टाकण्यात होती.जिल्ह्यतील खा.शरद पवारांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

दरम्यान या व्यवस्थापन समितीत माजी मंत्री दिलीप वळसे,माजी खा.रामशेठ ठाकूर,खा.सुप्रिया सुळे,आ.विश्वजित कदम,चंद्रकांत दळवी,ऍड.भगीरथ शिंदे,मीनाताई जगधने,आदी मान्यवर आहेत.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील सेवानिवृत शिक्षक सुरेश बोळींज यांचीही रयत शिक्षण संस्थेने दखल घेतली असून त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांनी अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले आहे.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे व नंतर संजीवनी साकार कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे निष्ठावान मानले जात आहेत.



