शैक्षणिक
..या गावात विद्यार्थ्यांना मिळणार मोफत वह्या!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या सौजन्याने कै.दशरथ (भाऊ) रहाणे याच्या स्मरणार्थ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी निमित्त विद्यार्थ्यांना दिनाक 30 जून रोजी सकाळी 09 वाजता सलग ३७ व्या वर्षी विनामूल्य वह्या वाटप व गुणगौरव समारंभ आयोजित केला असल्याची माहिती मलबार हिल विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कै.दशरथ (भाऊ) रहाणे याच्या स्मरणार्थ मलबार हिल विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे हे आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथे गेल्या ३७ वर्षापासून विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करत असतात.तो यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
शालेय मोफत वह्या वाटप कार्यक्रम हा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.याचा मुख्य उद्देश ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. तो कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर या ठिकाणी गेली ३७ वर्षे सातत्याने सुरू आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कै.दशरथ (भाऊ) रहाणे याच्या स्मरणार्थ मलबार हिल विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे हे आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथे गेल्या वीस वर्षापासून विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करतअसतात.तो यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर उपस्थित राहणार आहे.तर या निमित्ताने सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड.संदीप वर्पे यांचा सत्कार संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी अकोले येथील रहिवासी व जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विश्वास आरोटे,डॉ.तान्हाजी लामखडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमाचा बहादपूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेनेचे माजी तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी शेवटी केले आहे.


