जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

या वर्षीही…या गावाहून होणार रवाना पंढरपूर दिंडी!

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडीचे यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन केले असल्याची माहिती दिंडी संचालक ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

 

“पंढरपूरची वारी हा केवळ एक धार्मिक प्रवास नसून,महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि भक्ती, समानता,व समर्पणाचा एक अद्वितीय आध्यात्मिक उत्सव आहे.यामध्ये लाखो वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून अनेक दिवस पायी चालत, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा गजर करत पंढरपूरला पोहोचतात” -ह.भ.प.संजय महाराज जगताप,दिंडी संचालक,श्री क्षेत्र भऊर,तालुका वैजापूर.

  वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.तर राज्यातून अन्य ठिकाणी असलेल्या विविध श्रद्धाळू आपल्या गावाकडून या दिंडीत सामील होत असताना दिसून येत असताना असाच एक सोहळा गेल्या अनेक वर्षात अग्रस्थानी आला आहे.तो म्हणजे वैजापूर नजीक असलेल्या श्री क्षेत्र भऊर या ठिकाणाहून संजय महाराज यांचे मार्गदर्शनात व प्रमोद जगताप यांचे सहमार्गदर्शनात या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होते.

हा दिंडी सोहळा दि.१२ जून रविवार रोजी सकाळी ०९ वाजता श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.हा दिंडी सोहळा १२ जूलै रोजी खैरी तालुका श्रीरामपूर येथे मुक्कामी राहणार आहे.तसेच १३ जुलै रोजी देवळाली,तालुका राहुरी,१४ जुलै रोजी धामोरी,तालुका राहुरी,त्याचप्रमाणे १५ जुलै रोजी वडगाव गुप्ता रोड,अहिल्यानगर येथे मुक्काम ठोकणार आहे.तसेच १६ जुलै रोजी शिरढोण ता.जिल्हा अहिल्यानगर येथे तर १७ जुलै रोजी थेरगाव,तालुका कर्जत येथे हा दिंडी पालखी सोहळा मुक्कामी राहुट्या टाकणार आहे.त्याचप्रमाणे १८ जुलै रोजी पवार वस्ती आनंदवाडी,डाकू निमगाव,तालुका कर्जत,१९ जुलै रोजी करमाळा येथे तर २० जुलै रोजी मौजे पांगरे,तालुका माढा येथे तर २१ जुलै ला तांबवे टेंभुर्णी तालुका माढा येथे आपला बिछाना अंथरणार आहे.

या शिवाय २२ जुलै रोजी बार्डी पाटी भोसे,तालुका पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.२३ जुलै रोजी हा दिंडी सोहळा विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर येथे पोहोचणार असून २३ ते २६ जुलै या कालावधीत विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिसर,वेणूनगर,तालुका पंढरपूर येथे या दिंडीच्या राहुट्या पडणार आहे.

    या दिंडीमध्ये विणेकरी भाऊसाहेब महाराज जगताप,रथचालक नानासाहेब गायकवाड,ट्रॅक्टर सेवा गुलाबराव शेळके वैजापूर,कृष्णा जगताप,साईनाथ सोमवंशी,अशोक बाबासाहेब मुके,सुरेशराव बहिरट हे राहणार आहेत.मृदंगाचार्य काशिनाथ गंगाधर जगताप,भूषण महाराज शेळके,ईश्वर महाराज शेळके,सखाराम माळी बाबा,चि.स्वागत नानासाहेब मुके,संतोष जाधव हे राहणार असून दिंडी सेवक म्हणून आप्पासाहेब रामचंद्र मुके,बाळासाहेब पुंडलिक जगताप,भास्कर काशिनाथ जगताप,मच्छिंद्र मुरलीधर जगताप तर भारूडकार म्हणून समस्त भजनी मंडळी राहणार आहेत.विनापूजनासाठी कचरू चांगदेव जगताप हे असणार आहेत.या दिंडी सोहळ्यासाठी रस्त्यामध्ये विविध ठिकाणच्या अन्नदात्यांनी सकाळी चहा पाणी,नाश्ता,दुपारचे जेवण,सायंकाळचा चहा व सायंकाळचे मुक्कामाच्या ठिकाणी जेवण महाप्रसाद सेवा दिली आहे.या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी बिछानासोबत घ्यावा तसेच मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये.प्रवासामध्ये जीवित वित्तहानी झाल्यास त्यास ती व्यक्ती संपूर्णतः जबाबदार राहील. तरी या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या दिंडीचे मार्गदर्शक संजय महाराज जगताप भऊरकर तसेच सहमार्गदर्शक प्रमोद मुरलीधर जगताप यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close