धार्मिक
…या गावात अधिक मासानिमित्त कीर्तन महोत्सव होणार!

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी या ठिकाणी आदिक मासानिमित ज्येष्ठ शु.०५ गुरुवार दि.२१ मे पासून ज्येष्ठ शुद्ध १२ गुरुवार दि.२८ मे दरम्यान सायंकाळी ०७ ते ०९ वाजेच्या दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

दरम्यान या सप्ताहानिमित्त रोज पहाटे ०४ वाजता काकड आरती,सकाळी ०८ व दुपारी ०२ वाजता गाथा पारायण,सायंकाळी ०५ वाजता सामुदायिक हरिपाठ,सायंकाळी ०७ वाजता वारकरी संप्रदाय सिद्धमंत्र सामुदायिक जप,रात्री ०८ वाजता जाहीर हरीकीर्तन,रात्री ०९ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान या धार्मिक कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र गोदाधामचे महंत रामगिरीजी महाराज व महंत रमेशगिरीजी एक महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.किर्तन महोत्सव व गाथा पारायण सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ प.पू. महंत रमेशगिरीजी महाराज आश्रम यांच्या शुभहस्ते व भाविक-भक्तांच्या उपस्थितीत दिनाक १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजता श्री राम मंदिरासमोर संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी रामवाडी,संवत्सर,वारी,कान्हेगाव,धोत्रे,भोजडे, पढेगाव,शिंगणापूर आदी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन रामवाडी,संवत्सर येथील भजनी मंडळाने केले आहे.

दरम्यान यावेळी वारकरी संप्रदायासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महानुभावांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत-महंत यांचे हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान या रोज रात्री ०८ वाजता कीर्तनसेवेच्या कार्यक्रमासाठी दि.२१ मे रोजी सर्वश्री ह.भ.प.हरिशरण महाराज,२२ मे रोजी गणेश महाराज,२३ मे रोजी बाळासाहेब महाराज रंजाळे,२४ मे रोजी शिवाजी महाराज ठाकरे,२५ मे रोजी शिवनाथगिरीजी महाराज,दिनाक २६ मे रोजी अर्जुनगिरीजी महाराज,२७ मे रोजी शिवाजी महाराज तळेकर,गुरुवार दि.२८ मे रोजी सकाळी काल्याचे कीर्तन महंत रामगिरीजी महाराज यांचे होणार आहे.याचा भाविक भक्तांनी आणि धर्मानुयायी नागरिकांनी लाभ घ्यावा.काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान यावेळी वारकरी संप्रदायासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महानुभावांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत-महंत यांचे हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान या सप्ताहानिमित्त रोज पहाटे ०४ वाजता काकड आरती,सकाळी ०८ व दुपारी ०२ वाजता गाथा पारायण,सायंकाळी ०५ वाजता सामुदायिक हरिपाठ,सायंकाळी ०७ वाजता वारकरी संप्रदाय सिद्धमंत्र सामुदायिक जप,रात्री ०८ वाजता जाहीर हरीकीर्तन,रात्री ०९ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.या अधिकमास कार्यक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.



