गुन्हे विषयक
भोंदू खरातच्या पतसंस्थेतील ठेवीबाबत संभ्रम !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याने कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेत जवळपास स्वतःचे त्याच्या कुटुंबातील आणि वारस असलेल्या खात्यांची संख्या 70-72 असल्याचे तर स्वतः 47 खात्यांना वारस असल्याची माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली असताना आज पुन्हा एकदा समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भोंदूबाबाच्या ठेवी बाबद संभ्रम निर्माण केला आहे.त्यामुळे या संस्थेत संदीप कोयटे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे ठेवी 15 कोटी की संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितलेल्या ठेवी 06 कोटी असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत आमच्या प्रतिनिधीने संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांना तुमचे भोंदूबाबा अशोक खरात याचे खाली वाकून दर्शन करताना चलचित्रण दिवसभर दुचित्रवाणीवर सुरू होते.(याची त्यांना आधी कल्पना नव्हती असे निदर्शनास आले) त्याबाबत दोनदा प्रतिक्रिया देण्यास सांगितले असता त्यांनी मात्र त्यांनी त्या प्रश्नास सोयिस्कर बगल दिली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवे कारनामे समोर येत असून आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहे.त्याने अनेक नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती वापरून खरातने कोपरगाव नगरीत मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे केल्याचा संशय एस.आय.टी.ला आहे.त्यात कोपरगाव येथील अकराशे कोटींच्या ठेवीचा दावा करणाऱ्या माध्यमांत आघाडीच्या समता सहकारी पतसंस्थेचे नाव समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.त्यात रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचे नावाने एक खाते असून त्यात हा भोंदूबाबा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून व्यवहार करत असल्याच्या बातम्या दूरचित्रवाणीवर गेले काही सुरू होत्या.त्यामुळे कोपारगावसह उत्तर नगर जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्याबाबत दोन दिवसापूर्वी समता सहकारी पतसंस्थेत संचालक संदीप कोयटे यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या संस्थेत 15 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचा खुलासा केला होता.तर त्यानंतर बाहेर दौऱ्यावर असलेले त्यांचे पिताश्री आणि संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे कोपरगावात आल्यावर त्यांनी आज सकाळी 10.20 वाजता तातडीने पतसंस्थेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी हा गोंधळ उडाला असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे हित रक्षण करणे ही वित्तीय संस्थांची जबाबदारी आहे.त्याच बरोबर त्यांच्या ठेवीस वारस कोण लावायचा याचा अधिकारही त्यांचाच आहे.त्यात काही शंका नाही.मात्र तरीही कोयटे बाप आणि लेकांत भोंदू अशोक खरात याच्या ठेवीची रक्कम सांगण्यात एवढा मोठा फरक कसा पडला असा प्रश्न सामान्य वाचकाना आणि नागरिकांना पडला आहे.
त्यावेळी पुढें बोलताना ते म्हणाले की,”माध्यमात ज्या शेकडो कोटी ठेवी असल्याचे बोलले जात आहे त्यात मुळीच तथ्य नाही असा दावा करून त्यांनी त्याचे बचत खाते आणि मुदत ठेवी अशा केवळ 05-06 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या असा दावा केला आहे.तर वारस असलेले केवळ 48 खाते असल्याचा दावा केला आहे.आरोपीने ज्या काळात ही खाती उघडली तो कालखंड कोरोनाचा होता असा दावा केला आहे.त्यामुळे आमच्या ऑनलाइन बँकिंगचा जोर होता.तरीही आम्ही के.वाय.सी.करूनच सर्व खाती उघडली आहे.आता खातेदाराला कोण वारस लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.आम्ही ते कोणाला सांगू शकत नाही,त्यामुळे त्याची जबाबदारी आमचे संस्थेवर आणि संचालकांवर येत नाही असा दावा केला आहे.आमच्या एकूण 28 शाखा असून त्यातून जवळपास 1.25 लाख खातेदार आहे.सर्व व्यवहार हे सहकार कायदा अधिनियम-1960 अन्वये रीतसर सुरू असतात.त्यामुळे त्यामुळे ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आम्ही खातेदारांची नावे जाहीर करत नाही.आमच्या संचालकांना सुद्धा खातेदारांची नावे सांगितली जात नाही.त्यामुळे एकच संस्थेत नवरा आणि बायको यांचे खाते असू शकते.मात्र त्याच्या गोपनीयतेची जबाबदारी आमची आहे.आता खरात याचे खाते होते.ही बाब आम्ही लपून ठेवलेली नाही आणि पोलिसांनी चौकशी आणि मागणी केली त्या प्रमाणे त्यांना ती आवश्यक माहिती आम्ही पुरवली असल्याचे शेवटी सांगितले आहे.
दरम्यान नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे उपस्थीतीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात भोंदूबाबा अशोक खरात याच्याबरोबर तुमचे छायाचित्र कसे ? असा सवाल विचारला असता त्यांनी,”आमचा राज्य आणि देशभर दौरा सुरू असतो त्यावेळी सहकारी पतसंस्था चळवळीत काम करणारे कार्यकर्ते छायाचित्र काढण्यास फार मोठी गर्दी करतात;त्यांना आम्हाला नाही म्हणता येत नाही.भोंदू खरात तर एका पतसंस्थेच्या अध्यक्ष होता.त्यामुळे त्याचे छायाचित्र आले असेल तर त्यात काही नवल आणि वावगे नाही”मात्र आमच्या प्रतिनिधीने त्यांना तुमचे भोंदूबाबा अशोक खरात याचे खाली वाकून दर्शन करताना चलचित्रण दिवसभर दुचित्रवाणीवर सुरू होते.(याची त्यांना आधी कल्पना नव्हती असे निदर्शनास आले) त्याबाबत प्रतिक्रिया देण्यास दोनदा सांगितले असता त्यांनी मात्र त्यांनी त्या प्रश्नास सोयिस्कर बगल दिली असल्याचे दिसून आले आहे.



