आरोग्य
कोपरगाव तालुक्यात रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळीत नुकतीच कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नुकतीच रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत वैद्यकीय अधिकारी डॉ़.सुनिल मोरे यांचे कोरोना साथीचे यशस्वी व्यवस्थापन केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले असून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढ रोखण्यात बऱ्यापैकी यश आले असून नुकतीच टाळेबंदी उठविण्यात आली आहे तरी धोका अद्याप टळलेला नाही.या पार्श्वभूमीवर नुकतीच आढावा बैठक चासनळीत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी या साथीत लक्षवेधी काम करणाऱ्या डॉ.सुनील मोरेंसह अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सातारा,पुणे आणि कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.त्यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढ रोखण्यात बऱ्यापैकी यश आले असून नुकतीच टाळेबंदी उठविण्यात आली आहे तरी धोका अद्याप टळलेला नाही.या पार्श्वभूमीवर नुकतीच आढावा बैठक चासनळीत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी या साथीत लक्षवेधी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर दंडवते आणि सहअध्यक्ष राजेश परजणे,डाॅ.चांदगुडे, द्वितिय वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित सोनवणे,आरोग्य सहाय्यक श्री.शेख,श्री.बनसोडे,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,कनिष्ठ सहाय्यक श्रीमती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी आशां सेविकांनी कोरोना कालावधीत अतिशय मोलाची कामगिरी केलेबद्दल आशा गटप्रर्वतक यांचा सत्कार रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर दंडवते आणि सहअध्यक्ष राजेश परजणे यांचे हस्ते करण्यात आला आहे.त्याबद्दल वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांनी समाधान व्यक्त केले आहे.