धार्मिक
…या गावात लक्ष्मी माता यात्रा होणार !

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या लक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्याचा भोजडे आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू धर्मात माता लक्ष्मी ही धन,संपत्ती,ऐश्वर्य आणि सौभाग्याची देवी मानली जाते.ती भगवान विष्णूची पत्नी आहे.पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून तिचा जन्म झाला असून दीपावलीला तिची विशेष पूजा केली जाते.मात्र गावोगावी तिची स्थापना करण्यात आलेली असून तिची वर्षात एकदा यात्रा संपन्न होत असते.
हिंदू धर्मात माता लक्ष्मी ही धन,संपत्ती,ऐश्वर्य आणि सौभाग्याची देवी मानली जाते.ती भगवान विष्णूची पत्नी आहे.पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून तिचा जन्म झाला असून दीपावलीला तिची विशेष पूजा केली जाते.मात्र गावोगावी तिची स्थापना करण्यात आलेली असून तिची वर्षात एकदा यात्रा संपन्न होत असते.भोजडे येथे बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दीप अमावस्या या दिवशी ती संपन्न होणार आहे.
दरम्यान त्या निमित्त सकाळी 07 वाजता मूर्ती अभिषेक करण्यात येणार आहे.तर सकाळी 8.30 वाजता आरती संपन्न होणार आहे.सकाळी 09 वाजता सत्यनारायण पूजा तर सकाळी 10.30 वाजता भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.दुपारी 12.30 वाजता आरती व दुपारी 01 वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.याचा भोजडे आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



