निधन वार्ता
आशाताई शिंदे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब तुकाराम शिंदे यांची धर्मपत्नी व गोदावरी दुध संघाचे माजी संचालक यांची सुनबाई आशाताई (वय-४४) वर्ष यांचे बुधवारी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे पती व तिन मुले,सुना असा परिवार असुन,त्यांच्या निधनान्स सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मागील पंधरवाड्यात त्यांच्या सासुबाई विठाबाई शिंदे यांचे निधन झाले होते.त्या दुःखातुन हे कुटुंब सावरत असतानाच पुन्हा आशाताईच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसाळला आहे.पढेगांव वैकुठभूमीत त्यांचेवर अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.