जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा,६.१० लाखांचा ऐवज जप्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा करण्यावर बंदी घातलेली असतानाही धामोरी ग्रामपंचायत हद्दीत आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात काही वाळू चोर अवैध वाळूउपसा करत असल्याची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली असता त्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी शुभम विश्वनाथ गवारे (वय-१९वर्ष) राहणार मंजूर तालुका कोपरगाव,कैलास गाढे (पूर्ण नाव माहित नाही) राहणार चासनळी तालुका कोपरगाव (फरार),एकनाथ माळी (पूर्ण नाव माहित नाही) राहणार मोर्विस तालुका कोपरगाव(फरार),बबलू बाळासाहेब कापसे रा.कासारी तालुका कोपरगाव (फरार) आदी आपल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू चोरी करताना आढळून आल्याने पोलिसानी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून ३ लाख रुपये किमतीचा एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ७४४ स्वराज ट्रॅक्टर,लाल रंगाची दोन चाकी हायड्रोलिक ट्रॉली किंमत अंदाजे,१० हजार रुपये किमतीची एक ब्रास शासकीय वाळू किंमत अंदाजे,०३ लाख रुपये किमतीचा एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा न्यू हॉलांड ३६०० कंपनीचा ट्रॅक्टर त्यास दोन चाकी हायड्रोलिक ट्रॉली,एकूण किंमत अंदाजे एकूण ०६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना वाळूचोरांनी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच धामोरी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली की,या शिवारात गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे.त्या खबरीवरून तालुका पोलिसानी त्या ठिकाणी दि.बारा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास धाड टाकली असता आरोपी क्रमांक शुंभम गवारे व कैलास गाढे यांनी संगनमताने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मोर्विस गावचे जवळील गोदावरी नदीपात्रातील एक ब्रास शासकीय वाळू विनापरवाना बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर मध्ये भरली व आरोपी क्रमांक एकनाथ माळी व बबलू कापसे यांनी बेकायदेशीरपणे गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर ट्रॉली सह उतरून वाळूची चोरी करण्याचा प्रयत्न केला व आरोपी क्रमांक एकनाथ माळी हा गोदावरी नदी पात्र ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळून गेला व आरोपी क्रमांक बबलू कापसे हा गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉली सह पळून गेला वगैरे मजकुराच्या फिर्याद अंबादास रामनाथ वाघ यांनी दाखल केल्यावरून गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,५११,३४ प्रमाणे वरील चार आरोपींवर गुन्हा केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close