जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

रासायनीक खतांचा तुटवडा थांबवा-सुचना

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

    पाऊस झाल्याने शेतक-यांनी अडचणीत असताना पैशांची जुळवाजूळव करून पेरण्या केल्या असून वर्तमानात पिके चांगली आहेत मात्र गरजेच्या वेळी त्यांना रासायनीक खते कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्या.युरियाची कृत्रिम साठेबाजी सहन करणार नाही त्याकडे आपले लक्ष असणार असल्याची ताकीद आ.आशुतोष काळे यांनी संबंधित अधिका-यांना दिली आहे.

“वर्तमानात पाऊस उशीरा झाल्याने पेरण्या महिनाभर उशिरा झाल्या आहेत.मात्र आगामी काळात पावसाने पुन्हा डोळे वटारले तर उत्पादन कमी होवून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने केलेल्या अवाहनाला शेतक-यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.पिक विमा हा उत्पन्नाच्या आधारावर दिला जात असल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा काढावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   रासायनिक खतांचा तुटवडा ही सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे शेतीसमोरील एक गंभीर समस्या बनली आहे.जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या मालाचे वाढलेले दर यामुळे भारतात रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असून प्रामुख्याने डाय-अमोनियम फॉस्फेट खताचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.कोपराव तालुक्यात याचा तडाखा शेतकऱ्यांना बसत आहेच पण त्यातच काही सहकारी सेवा संस्था आणि खाजगी विक्रेते अवैध साठेबाजी करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.त्यामुळे कोपरगाव तालुका कृषी विभागाने नुकतीच मंजूर हद्दीत एक छापा टाकून दोन जणांवर कारवाई केली आहे.या पार्श्वभूमीवर आज आ.काळे यांनी   रासायनिक खत विक्रेते आणि कृषि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,राहाता तालुक्याचे कृषी अधिकारी आबासाहेब भोरे,पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी,राहुल कदम,वाळीबा उघडे, यांच्यासह कृषी सहाय्यक अशिकारी,रासायानिक खत विक्रेते,कृषीसेवा केंद्र चालक उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होते.शेतक-यांना मनस्ताप होतो.कृषी विभागाने मतदारसंघात नवीन पेरण्यांचा आणि पिकांचा आढावा घेऊन गरजेनुसार खतांचा अतिरिक्त साठा उपलब्ध करावा.मतदारसंघात युरिया खताची साठेबाजी,कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडचण किंवा पिळवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close