जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आपत्कालीन फोन क्रमांकाचा दुरुपयोग,एकावर गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील सावळगाव येथील एका आरोपीने आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ११२ क्रमांकाचा दुरुपयोग करून फुकट गुटखा दिला नाही याचा राग मनात धरून एका दुकानदाराच्या विरुद्ध कट केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कॉलर सागर छगन भागवत रा.सावळगाव याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे खोटारडेपणा करणाऱ्या असामाजिक तत्वांना चाप बसण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

 

“आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी ११२ हा भारताचा सर्वसमावेशक आपत्कालीन क्रमांक देशाच्या गृह विभागाने जाहीर केला आला आहे.ज्याद्वारे पोलिस,रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल या सर्व सेवा एकाच ठिकाणाहून आपत्कालीन मदत उपलब्ध होतात.मात्र त्याचा अलीकडील काळात काही असामाजिक तत्व दुरुपयोग करताना आढळून येत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सावळगाव येथे घडली आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी ११२ हा भारताचा सर्वसमावेशक आपत्कालीन क्रमांक देशाच्या गृह विभागाने जाहीर केला आला आहे.ज्याद्वारे पोलिस,रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल या सर्व सेवा एकाच ठिकाणाहून आपत्कालीन मदत उपलब्ध होतात.हा नंबर २४ तास आणि ३६५ दिवस चालू असतो.चोरी,हाणामारी,दरोडा किंवा जीवाला धोका असताना किंवा महिलांवर अत्याचार,छेडछाड किंवा संकटाच्या प्रसंगी त्वरित मदतीसाठी हा क्रमांक डायल केल्यास कॉलरला रस्ता अपघात किंवा गंभीर आजारपणात रुग्णवाहिका हवी असल्यास कुठेही आग लागल्यास किंवा गॅस गळतीसारख्या दुर्घटना घडल्यास जलद प्रतिसाद मिळतो व कॉल केल्यानंतर काही मिनिटांतच घटनास्थळी मदत पोहोचते.व कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत मिळते. यात फोन करणाऱ्याचे ठिकाण (जी.पी. एस.ट्रॅकिंग) आपोआप समजते,ज्यामुळे मदत पाठवणे सोपे होते.हा कॉल पूर्णपणे विनाशुल्क (टोल फ्री)आहे.स्मार्टफोनवर पॉवर बटण तीन वेळा दाबून हा आपत्कालीन नंबर सक्रिय करता येतो.त्याच्यामुळे अनेक दुर्घटना टळत असून अनेकाना वेळेत मदत मिळवून अनेकांचे प्राण वाचण्यासह जीवित हानी टळत आहे.मात्र काही खोडीबहाद्दर याचा दुरुपयोग करून आपला स्वार्थ साधून पोलिसांना फसवण्यास मागेपुढे पहात नाही अशा दुर्दैवी घटना नुकतीच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावळगाव येथे काल दुपारी १२.५९ वाजता घडल्याचे समोर आले आहे.

 

  यातील कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी युवराज खुळे हे आपली डायल ११२ वर कर्तव्य करत असतांना दि.३१ जुलै रोजी १२.५९ वाजता त्यांचेकडे असलेल्या एम.डी.टी.मशिनवर सी.एफ.एस.38451179 या आय.डी.नंबर वर कॉल आला होता.त्यात कॉलर याने म्हटले होते की,”सावळगाव या ठिकाणी टपरीमधुन एक टपरीचालक हा अवैध गुटखा विक्री करत आहे.त्याने त्यावेळी आपली कॉलरची माहीती गुप्त ठेवावी अशी विनंती करून आपल्याला पोलीस मदत हवी असल्याची त्या कॉलवर बतावणी केली होती.त्यानंतर पोलिस कर्मचारी खुळे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली होती. यातील कॉलर सागर छगन भागवत रा.सावळगाव याचे समक्ष तसेच दोन पंचासमक्ष,” प्रियंका जनरल स्टोअर्स”ची झाडाझडती घेतली होती.मात्र या चौकशीत त्यांना कुठेही गुटखा आढळुन आला नाही.त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की यातील कॉलर सागर छगन भागवत याने पोलिसांना आपल्या कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करुन दत्तात्रय संपत गायकवाड या दुकानदारास त्रास व्हावा या उददेशाने खोटा कॉल करुन खोटी माहिती देऊन पोलिसांची फसवणूक केली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन पंचसमक्ष पंचनामा केला आहे.आणि आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहिता -२०२३ चे कलम २१७ प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल युवराज खुळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close