गुन्हे विषयक
रेल्वेतून उतरून एकाची आत्महत्या,मृत्यूची नोंद!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी हद्दीत छत्तीसगड येथील मजुर मनहरण ध्रुव ( वय -27) याने आपल्या घरी जाताना थांबलेल्या रेल्वेतून उतरून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.याबाबत नजीकच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यावर यांनी तातडीने त्याला उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले आहे.

दरम्यान याबाबत माहिती घेतली असता कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांचे पोलिस कर्मचारी अंबादास वाघ यांनी त्यांना भाडे अन्य मदत देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी येण्यास नकार दिला आहे.परिणामी त्याचा अंत्यविधी कोपरगाव येथेच करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात परप्रांतीय मजुरांची वाढती संख्या ही रोजगार,सामाजिक सुरक्षा आणि स्थानिक रहिवाशांच्या अधिकारांवर परिणाम करणारी एक महत्त्वाची व गुंतागुंतीची समस्या बनली आहे. यात प्रामुख्याने रोजगार संधी,स्थानिक कामगारांवर विपरीत परिणाम होत आहे.परिणामी बांधकाम,कारखाने आणि शेती क्षेत्रात परप्रांतीय मजूर कमी वेतनात सहज उपलब्ध होत आहे.स्थानिक कामगारांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींवर याचा थेट परिणाम होत आहे.वाढत्या स्थलांतरामुळे नागरी वस्त्या,आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर अतिरीक्त ताण पडत आहे ही बाब वेगळीच आहे.याबाबत सरकार काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.परिणामी राज्यात हा अतिरिक्त भर वाढत चालला आहे.त्यातून गुन्हेगारी जशी वाढत आहे तशीच स्थानिक पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडत आहे.त्यात काही मजूर निराशा,कायमची भ्रमंती,कमी मिळणारा रोजगार यामुळे त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या मजुरांच्या आत्महत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव तालुक्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे.एका रेल्वेने सपत्नीक प्रवास करत असताना छत्तीसगड येथील मजुर मनहरण ध्रुव याने आपल्या पत्नीला काही एक न सांगता वारी येथील रेल्वे स्थानकावर उतरून घेतले होते.तो व्यसनांचे आहारी गेला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.मात्र पत्नीकडे भ्रमणध्वनी नसल्याने तिला काहीही करता आले नाही.त्याच्या पश्चात दोन मुले असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान या इसमाने वारी शिवारात एका झाडाला आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्याच्या खिशात आधारकार्ड असल्याने तो नेमका कुठला आहे याचा पोलिसांनी शोध लावला आहे.व त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते.मात्र त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या नातेवाईकांनी आर्थिक कारणाने नकार दिला आहे.त्याच्या पत्नीने आपल्याकडे येण्यासाठी पैसे नसल्याने आपण त्या ठिकाणी येऊ शकत नाही असा सांगावा धाडला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.परिणामी कोपरगाव याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान याबाबत माहिती घेतली असता कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांचे पोलिस कर्मचारी अंबादास वाघ यांनी त्यांना भाडे अन्य मदत देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी येण्यास नकार दिला आहे.परिणामी त्याचा अंत्यविधी कोपरगाव येथेच करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.याबाबत सर्वात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद रजिस्टर क्रमांक 57/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अंबादास वाघ हे करत आहेत.,



