न्यायिक वृत्त
आरोपी व्यवस्थापकास चार दिवसांची पोलीस कोठडी,संस्थाचालकांची तारांबळ !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राहाता शहरातील समता पतसंस्थेच्या शाखेत शंभर बनावट खाते प्रकरणात तपासाला आता आणखी वेग आला आहे.या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई करत समता पतसंस्थेच्या राहाता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर याला सोमवारी उशिरा अटक करून मंगळवारी येथिल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आगामी ७ ऑगस्ट पर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती एस.आय.टी.चे तपास अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे.दरम्यान या घटनेने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थाचालक यांची मोठी तारांबळ उडाली असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

दरम्यान,मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर राहाता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आल्याने तो चौकशीत काय माहिती देतो त्यानंतरच आणखी काही जणांवरही कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.रम्यान या घटनेने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थाचालक यांची मोठी तारांबळ उडाली असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.
सिन्नर तालुक्यातील महाठग तथा भोंदू अशोक खरात याने दैवी शक्ती व चमत्कारांचे आमिष दाखवून भक्तांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.समता नागरी सहकारी पतसंस्थेत १०० हून अधिक बनावट खाती उघडून सुमारे ६० कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार व मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांकडून आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ई.डी.) त्याचा कसून तपास सुरू असून न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याच्या चौकशीतून समोर आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत तब्बल ५७ व्यक्तींच्या नावावर १०२ बनावट खाती उघडण्यात आली होती.विशेष म्हणजे या सर्व खात्यांमध्ये महाठग अशोक खरात याचेच नाव वारसदार म्हणून नोंदविण्यात आले होते.या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.शिर्डी पोलिसांनी संबंधित खातेदारांची चौकशी केली असता,सर्वांनी आपण कोणतेही खाते उघडले नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खाती उघडण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे.या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा तपास सुरू आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. बनावट खाती उघडण्यासाठी पतसंस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती,याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान या संर्दभात पतसंसंथेत १०२ खाते उघडतांना सह्या कोणी केल्या,या उघडलेल्या खात्यांवर रोख रक्कमा कोणी भरल्या,नंतर पैसे काढतांना खातेदारांच्या सह्या कोणी केल्या असा युक्तीवाद तपासी अधिकारी भारती यांनी न्यायालयासमोर केला आहे.हा युक्तीवाद ग्राह्य धरुन अधिक तपास करण्यासाठी व्यवस्थापक मिलिंद बनकर याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यात आरोपी खरात याचे वतीने ॲड.जयंत जोशी यांनी काम पाहिले आहे त्यांना ॲड. व्ही.पी.ख्रिस्ते यांनी सहाय्य केले आहे तर आरोपी बनकर याचेवतीने ॲड.कासलीवाल यांनी काम पाहिले आहे.
दरम्यान,मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर राहाता शाखेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक करण्यात आल्याने तो चौकशीत काय माहिती देतो त्यानंतरच आणखी काही जणांवरही कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.समता पतसंस्थेतील या कथित आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणती नवी माहिती समोर येते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणी दिनेश परब यांनी राहाता पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.दरम्यान समताचा राहाता शाखेचा व्यवस्थापक बनकर याला अटक केल्याने कोपरगाव येथील त्यांच्या संस्थाचालकांची मोठी तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.आता यात बनकर याचंच सहभाग आहे की त्यात संस्थाचालकांची सहभागी आहे हे लवकरच कळणार असल्याची उलटसुलट चर्चा उत्तर नगर जिल्ह्यासह कोपरगाव,राहाता परिसरात सुरू झाली आहे.



