जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात वंचितचे उमेदवार अशोक गायकवाडच विजयी होणार असल्याचा दावा

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा निवडणुकीत मतदारांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढत देत असलेले वंचित आघाडीचे युवा उमेदवार अशोक गायकवाड यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क निर्माण केला असून या बळावर आपण निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

वंचित आघाडीचे उमेदवार अशोक गायकवाड हे उत्तम संघटक व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात कामास येणारे मितभाषी नेतृत्व असून त्यांच्यापासून जनतेला खूप अपेक्षा आहेत.याना कोपरगाव शहर व पोहेगाव पुणतांबा,धामोरी,दहिगाव बोलका,धोत्रे,वारी,चासनळी, कोळपेवाडी,चांदेकसारे,आदी ठिकाणी खूपच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याची माहिती उमेदवार अशोक गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे.

कोपरगाव विधानसभा निवडणूक येत्या सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत भाजप कडून आ. स्नेहलता कोल्हे, तर राष्ट्रवादीकडून कर्मवीर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे हे लढत आहे.तर अपक्ष म्हणून कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे आपले नशीब आजमावत आहे.तर वंचित बहुजन आघाडीकडून संवत्सरचे माजी सरपंच विजय गायकवाड यांचे चिरंजीव अशोक गायकवाड यांनी सर्वात प्रथम वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यात यश मिळवले यश मिळवले होते.सर्वच राजकीय पक्षांकडून आपली प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.

एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या होत्या त्यात वंचित आघाडीने बरीच निर्णायक मते आपल्याकडे खेचून घेतली होती.त्यामुळे युती व विरोधी आघाडीत खळबळ माजली होती. त्या निवडणुकीत विजयाची निर्णायक मते वंचितचे आपल्याकडे खेचून घेतल्याने भाजप -शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जबर धक्का बसला होता.एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आगामी निवडणुकी नंतर वंचित आघाडीचाच विरोधी पक्ष नेता होणार असल्याचे भाकीत वर्तविल्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या पोटात खोल दुखण्यास प्रारंभ झाला होता.तर वंचित आघाडीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गत एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या होत्या त्यात वंचित आघाडीने बरीच निर्णायक मते आपल्याकडे खेचून घेतली होती.त्यामुळे युती व विरोधी आघाडीत खळबळ माजली होती. त्या निवडणुकीत विजयाची निर्णायक मते वंचितचे आपल्याकडे खेचून घेतल्याने भाजप -शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जबर धक्का बसला होता.एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आगामी निवडणुकी नंतर वंचित आघाडीचाच विरोधी पक्ष नेता होणार असल्याचे भाकीत वर्तविल्यामुळे अनेकांच्या पोटात खोल दुखण्यास प्रारंभ झाला होता.तर वंचित आघाडीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.कोपगावात तर वंचितला मागील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेला उमेदवार मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून पळत असल्याचे दिसून आले आहे.अशोक गायकवाड हे उत्तम संघटक व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात कामास येणारे मितभाषी नेतृत्व असून त्यांच्यापासून जनतेला खूप अपेक्षा आहेत.याना कोपरगाव शहर व पोहेगाव पुणतांबा,धामोरी,दहिगाव बोलका,धोत्रे,वारी,चासनळी, कोळपेवाडी,चांदेकसारे,आदी ठिकाणी खूपच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याची माहिती उमेदवार अशोक गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे.व कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.21 ऑक्टोबर नंतर होणाऱ्या 24 तारखेकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close