जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव विधानसभा निवडणुकीत निवडून दिल्यास एक रुपया मानधन घेणार-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्याला निवडून दिल्यास आपण जनतेची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू व आमदारकीचे सर्व मानधन जनतेसाठी खर्च करू त्यापैकी केवळ नाममात्र एक रुपयांचे मानधन स्वीकारू असे स्पष्ट प्रतिपादन कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवार तथा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका प्रचारसभेत बोलताना केले आहे.

कोपरगाव साठवण तलावातील पाणी कुठे जाते हे आपण आम जनतेला व पत्रकारांना समक्ष नेवून दाखवले आहे.त्यामुळे पाण्याचे खरे चोर कोण आहेत हे सगळ्या जनतेने उघड्या नजरेने पाहीले आहे.निळवंडेच्या पाण्याबाबत हि मंडळी या पाणीचोरीकडे लक्ष जाऊ नये यासाठी हा तमाशा करत आहे व जनतेत संभ्रम पसरून मतदारांची मते लाटण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे.आपण तर यांनी निळवंडेचे पाणी आणले तर जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर यांचा पहिला सत्कार करू हे सांगितले आहे.तरीही ते विरोधक आमच्यात शोधत आहे या बद्दल. विजय वहाडणे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कोपरगावसह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात येत्या सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक संपन्न होत आहे.कोपरगावात विद्यमान भाजपच्या आ.स्नेहलता कोल्हे यांचेशी राष्ट्रवादीचे उमेदवार व कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी- परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व वंचितचे अशोक गायकवाड अशा पाच जणांशी सामना होत आहे.

या निवडणुकीत आता प्रचाराचा सांगता समारंभ आज संपन्न होत असून प्रचाराला सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांची सभा काल रात्री आठच्या सुमारास कोपरगाव शहरातील विवेकानंद चौकात मोठ्या उत्साहात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव हे होते.

सदर प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते रामदास खैरे,टेकचंद खुबाणी,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वाल्मीकराव भोकरे,शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,युवा शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव रुपेंद्र काले, जिल्हा किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब गाढवे,मोदी विचार मंचचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी नगरसेवक संजय कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विधीज्ञ दिलीप लासुरे,प्रमोद पाटील,श्री कोपरे,किरण थोरात,युवा नेते वैभव बागुल,वेसचे प्रथम सरपंच माणिक दिघे,शिवराज वहाडणे,उमाताई वहाडणे,आप्पासाहेब कोल्हे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

काळे-कोल्हे यांच्या कारखान्याच्या वार्षिक सभा एकाच दिवशी एकाच वेळी होत असून ते एकाच दुकानातील चिवडा वाटून तुम्हाला-आम्हाला व जनतेला मूर्खात काढण्याचे काम करत आहे.जनतेने दिलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून हे नगरपरिषदेची कामे होऊ देत नाही व उलट पुन्हा नगराध्यक्ष कामे करत नाही अशी बोंब मारण्याचे दुहेरी काम करत आहे.वास्तविक नोव्हेंबर 2016 मध्ये कोपरगाव नगरपरिषदेचा जनतेने आपल्याला निवडून देण्याचा निर्णय या सत्ताधाऱ्यांना फारच झोंबलेला आहे.

त्यावेळी पुढे बोलता ते म्हणाले की,कोपरगाव तालुक्याला दोन सहकार सम्राटांनी पार वेड्यात काढले आहे.यांच्या कारखान्याच्या वार्षिक सभा एकाच दिवशी एकाच वेळी होत असून ते एकाच दुकानातील चिवडा वाटून तुम्हाला-आम्हाला व जनतेला मूर्खात काढण्याचे काम करत आहे.जनतेने दिलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून हे नगरपरिषदेची कामे होऊ देत नाही व उलट पुन्हा नगराध्यक्ष कामे करत नाही अशी बोंब मारण्याचे दुहेरी काम करत आहे.वास्तविक नोव्हेंबर 2016 मध्ये कोपरगाव नगरपरिषदेचा जनतेने आपल्याला निवडून देण्याचा निर्णय या सत्ताधाऱ्यांना फारच झोंबलेला आहे.त्यामुळे पाच क्रमांकाच्या तलावाचे काम होऊ देण्यात त्यांची मांजर कायम आडवी जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी थेट माती उचलण्याचे आदेश देऊनही हीच मांजर काम होऊ देत नाही.हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.एरवी संबंधित समृद्धीच्या ठेकेदाराला पन्नास कि.मी.वरून माती आणण्यास परवडते मात्र कोपरगाव नगरपरिषदेच्या साठवण तलावाची माती सात कि.मी.वरून आणण्यास त्याना परवडत नाही. हे गौडबंगाल न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.कोपरगाव पालिकेत एका माजी नागराध्यक्षाची नगरसेवक पत्नी आपल्यावर काम करत नसल्याचा आरोप करते.मात्र त्यांचाच मुलगा आपल्या पालिकेत ठेकेदारिने काम करत असून त्यांची बिले तयार होऊन आपल्या टेबलबवर पडली आहे.मग मला नाईलाजाने काम थांबवावे लागेल असा इशारा देऊन उपस्थितांना त्यांनी काय करू म्हणून विचारले.त्यावेळी उपस्थितांत एकाच हशा पिकला.

निळवंडे कालवा कृती समिती त्यांच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आपला लढा देत आहे.याच आरोप करणाऱ्या नेत्यांनी त्या शेतकऱ्यांना दर निवडणुकीत आश्वासने देऊन 48 वर्ष फसवले आहे.कालव्यांची खोटी उदघाटने केली आहे. दारणा धरणावरून 89 कोटींचा बंद जलवाहिणीचा प्रस्ताव कोणी बनवला होता.व त्याला खोडा कोणी घातला असा सवाल करून यांनीच आपल्या नातेवाईकांचे हित जोपासण्यासाठी इंडिया बुल्सला पाणी दिले आहे-रुपेंद्र काले शेतकरी संघटनेचे नेते

कोपरगाव साठवण तलावातील पाणी कुठे जाते हे आपण आम जनतेला व पत्रकारांना समक्ष नेवून दाखवले आहे.त्यामुळे पाण्याचे खरेच चोर कोण आहेत हे सगळ्या जनतेने उघड्या नजरेने पाहीले आहे.निळवंडेच्या पाण्याबाबत हि मंडळी जनतेत असाच संभ्रम पसरून मतदारांची मते लाटण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे.आपण तर यांनी निळवंडेचे पाणी आणले तर जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर यांचा पहिला सत्कार करू हे सांगितले आहे.तरीही ते विरोधक आमच्यात शोधत आहे.राज्यात यांना विरोधक दिसत नाही मात्र कोपरगावात तो दिसतो आहे हे विशेष ! या बद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी.खा.सूर्यभान पाटील वहाडणे,माजी विधान परिषद अध्यक्ष ना.स.फरांदे,या सारख्या अनेक नेत्यांनी राज्यात व जिल्ह्यात भाजप उभा केला त्यावेळी या मंडळींना हा पक्ष अस्पृश्य वाटत होता मात्र पक्षाची जाळेमुळे पक्की झाल्यावर त्याना हा पक्ष आता सत्तेसाठी आपलासा वाटत आहे.यांना पक्षाशी काही देणे घेणे नाही केवळ आपली संस्थाने व त्यातील चोऱ्या झाकण्याचे काम करायचे आहे.यांच्या बोगस दारू निर्मितीमुळे शहर व तालुक्यात पन्नासहून अधिक तरुणांचे बळी गेले आहे याला जबाबदार कोण असा तिखट सवालही त्यांनी केला आहे.तालुक्याची शेती भकास झाली त्यावेळी हे कुठे गेले होते,समन्यायी पाणी वाटप कायदा झाला तेव्हा हे अज्ञातवासात गेले होते का ? असा तिखट सवालही त्यांनी केलेला आहे.आपण औद्योगिक वसाहतीबाबत उद्योग मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले व त्या नंतर मंत्र्यांनी जमीन अधिग्रहण करण्याचा अहवाल पाठविण्याचे फर्मान काढल्यावर हे जागे झाल्याचे नाटक करून यांनी मंत्र्यांबरोबरचे फोटो सेशन केल्याचा आरोपही केला आहे.शहरातील अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कत्तलखाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावला.खंडकऱ्यांच्या जमिनी सोडविण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पाटील वहाडणे यांनी तुरुंगवास भोगला.हे मात्र जमिनी मोकळ्या झाल्यावर फोटो काढण्यास उभे राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला.कोपरगाव शहरातील जिल्हा प्रदर्शनची जमीन कोल्हे आणि काळे या दोघांनी मिळून हडप केली असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी प्रमोद पाटील, वाल्मीकराव भोकरे,रामदास खैरे,रुपेंद्र काले, टेकचंद खुबाणी,नामदेवराव जाधव,आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चेतन खुबाणी यांनी तर उपस्थितांचे आभार विनायक गायकवाड यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close