जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरालगत जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.तो ज्ञानेश्वरांनी लिहिला असून आजही समाज या ग्रंथाला प्रमाण मानतो महाराष्ट्रात अनेक महान लोकनायक होऊन गेले. ज्यांनी अखंड त्याग केला, म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात मानाने जगत आहोत; परंतु त्यांचे आदर्श जीवन आज समाज विसरत चालला आहे. अशा राष्ट्रपुरुषांची लहान मुलांना समजतील अशी चरित्रे तयार केली पाहिजेत, अशा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची जयंती म्हणजे मोठ्या आनंदाचा दिवस.असा दिवस विद्यार्थ्यांवर बिंबवला पाहिजे हि काळाची गरज ओळखुन संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे पुजन करून करण्यात आली.

ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला असून आजही समाज या ग्रंथाला प्रमाण मानतो महाराष्ट्रात अनेक महान लोकनायक होऊन गेले. ज्यांनी अखंड त्याग केला, म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात मानाने जगत आहोत; परंतु त्यांचे आदर्श जीवन आज समाज विसरत चालला आहे. अशा राष्ट्रपुरुषांची लहान मुलांना समजतील अशी चरित्रे तयार केली पाहिजेत, अशा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची जयंती म्हणजे मोठ्या आनंदाचा दिवस.

यावेळी प्रमुख उपस्थितीत कोपरगाव पालिकेचे माजीनगराध्यक्ष राजेंद्र झावरे,संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर , जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सोनवणे, अॅड.शंकर यादव, शाळेचे समन्वयक पोपट झुरळे , शाळेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे, योग शिक्षक तुषार सिसोदिया ,शाळेचे प्राचार्य एस.एस.मोरे आदी मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते.

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकांनी व उपस्थित पालकांनी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे पुजन केले. उपस्थितांना दिलीप सोनवणे यांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त शुभेच्छा देऊन इ.स. १२९० साली संत ज्ञानेश्वरांनी आपल्याच जिल्ह्यातील पवित्र अशा नेवासे येथे पैस खांबाला टेकून श्रीमद्भगवत गीतेचे मराठीत अनुवाद केले व सर्व सामान्यांना संस्कृत ग्रंथ मराठीत सोप्या भाषेत समजुन सांगितला. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कुल हे असे एकमेव स्कुल आहे की, ज्या स्कुलने ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी जयंती साजरी केली आहे असे सांगुन उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने करण्यात आली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close