जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सडे गावात अज्ञात इसमाचा मृतदेह,परिसरात खळबळ,

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदी पात्रात शिवाजी शंकर बारहाते यांच्या विद्युत मोटारीचे पाईपला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने सडे शिवारात खळबळ उडाली आहे.

सडे ग्रामपंचायत हद्दीतून गोदावरी नदीपात्र वाहते.या नदी पात्रालगत त्याच गावातील शेतकरी शिवाजी बारहाते यांची शेती असून त्यांनी नदीपात्रात विहीर खोदून आपल्या शेतीस बंदिस्त जलवाहिनीने पाणी नेलेले आहे.ते आपल्या विहिरीवर आपल्या नियमित कामासाठी गेले असता व गोदावरीस पुराचे पाणी कमी झाले असल्याने त्यांना आपल्या विहिरीतील पाईपला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यांनी या बाबत गावातील पोलीस पाटील नानासाहेब पांडुरंग शेलार यांना याबाबत खबर दिली.

या इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचा पूर्ण बाहिचा सदरा, अंगावर राखाडी रंगाची विजार,लाल रंगाची लंगोट असून यावरून पोलिसांनी सदर इसम पहिलवान असावा असा कयास व्यक्त केला आहे.चेहरा जलचर प्राण्यांनी कुर्तडला आहे.अंगावर shoeco usa -l p अशी इंग्रजी अक्षरे आहेत.पावसाचे जर्किंग राखाडी रंगाचे असून सदर इसम धष्ट पुष्ट असल्याने पहिलवान असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात या बाबत माहिती दिली असून पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद घेण्यात आली आहे.या इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचा पूर्ण बाहिचा सदरा, अंगावर राखाडी रंगाची विजार,लाल रंगाची लंगोट असून यावरून पोलिसांनी सदर इसम पहिलवान असावा असा कयास व्यक्त केला आहे.चेहरा जलचर प्राण्यांनी कुर्तडला आहे.अंगावर shoeco usa -l p अशी इंग्रजी अक्षरे आहेत.पावसाचे जर्किंग राखाडी रंगाचे असून सदर इसम धष्ट पुष्ट असल्याने पहिलवान असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या बाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी जनशक्तीशी बोलताना केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close