जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पुणतांब्यातील कर्जमाफीचा संप कोपरगावच्या आमदारानेच मोडला-आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव मतदार संघातील पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पुकारलेला संप मोडून काढण्याचे मोठे पवित्र काम तालुक्यातील आमदारांनी केल्याने राज्यातील शेतकरी अद्यापही कर्जमाफीतून वंचित राहिला असल्याची कठोर टीका कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी यांनी नुकतीच एका प्रचार सभेत केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी दसरा सणाच्या दिवशीही शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून उपोषणाला बसले होते. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला मात्र कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता त्यावेळी आपण देखील आमरण उपोषण केले होते. तर चांदेकसारे गटातील शेतकरी दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून जिवंतपणी सरणावर बसले होते. हे तालुक्याचे मोठे दुर्दैव आहे-आशुतोष काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी ठिकाणी आशुतोष काळे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान मतदारांशी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.

गत पाच वर्षात मतदार संघातील सर्वच घटकातील जनतेने मोठा अन्याय सहन केला असून शेतकऱ्यांवरही मोठा अन्याय झाला आहे. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्म भरून देखील पाणी मिळाले नाही. त्यावेळी शेतकरी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. गावतळे भरून मिळावे यासाठी शेतकरी ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर उपोषण करीत होते. दोनच दिवसांपूर्वी दसरा सणाच्या दिवशीही शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून उपोषणाला बसले होते. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला मात्र कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता त्यावेळी आपण देखील आमरण उपोषण केले होते. तर चांदेकसारे गटातील शेतकरी दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून जिवंतपणी सरणावर बसले होते.मतदार संघातील शेतकऱ्यांना व प्रत्येक घटकातील नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी शासनाच्या विरोधात भांडावे लागले आहे. ज्या विश्वासाने आपल्याला जनतेने निवडून दिले त्या विश्वासाला नेहमी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी व सर्वसामान्य माणसाला त्याचा न्याय हक्क मिळवून देणे हे लोकप्रतिनिधींचे फक्त कर्तव्यच नाही तर नैतिक जबाबदारी असते. परंतु दुर्दैवाने कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींना आपल्या कर्तव्य व जबाबदारीचा विसर पडल्यामुळे जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. आपण ही परिस्थिती बदलून दाखवितो आपण मला सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आशुतोष काळे यांनी शेवटी उपस्थितांना यावेळी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close