निधन वार्ता
गौरव बोठे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील करंजी येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी गौरव दिलीपराव बोठे यांचे रविवार दि. २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते अवघ्या २७ वर्षांचे होते.करंजी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी व अवघ्या तीन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै.गौरव बोठे हे मनमिळाऊ व कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडलेला होता.शेतीमध्येही त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवून प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांनी लौकीक मिळविला होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै.गौरव बोठे हे करंजी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ त्र्यंबकराव बोठे यांचे नातू होते.वर्तमानात ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारख्यान्यामध्ये ओव्हरशियर या पदावर कार्यरत होते.मनमिळाऊ व कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडलेला होता.शेतीमध्येही त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवून प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांनी लौकीक मिळविला होता.
कै.गौरव बोठे हे करंजी येथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी दिलीपराव काशिनाथ बोठे यांचे चिरंजीव तसेच संवत्सर येथील शंकरराव परजणे पा. यांचा नातू होते. त्यांच्या अंत्यविधीसमयी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवन,येवला येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.आशुतोष काळे, गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी कै.गौरव बोठे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीसाठी करंजी पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


