जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एकमेव श्री गणेशाची उत्साहात स्थापना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज “एक गाव एक गणपती” हि संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा निर्णय घेतला असून विद्येची देवता श्री गणेशाची विघ्नेश्वर चौकात तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या दोघांनी सपत्नीक विधिवत पुजा विधी करून मोठ्या उत्साहात श्री गणेशाची स्थापना केली आहे.”श्रीं”च्या या स्थापनेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

दरम्यान या वेळी समितीने “श्रीं”च्या आरतीला कोरोना लढाईत महत्वपूर्ण योगदान देणारे स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,कोरोना कालखंडात नागरिकांना अन्नदानासह विविध सेवा पुरविणारे विविध संस्थांचे पदाधिकारी आदींना “श्रीं”च्या पूजेचा मान देण्यात येणार आहे.तर विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आरती सकाळी १०.३० तर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.आज सायंकाळी पोलीस निरीक्षक मानगावकर व वर्षाताई मानगावकर यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न होणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही.गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं.गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे.तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे.या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली.या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.मात्र वर्तमानात जगभर कोरोना साथीने कहर केला असल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटलेले आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ५९५ इतकी झाली आहे.त्यात १८४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर २.०१ टक्के आहे.अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह,आजी-माजी नगरसेवकही या साथीला बळी पडले आहे.त्यामुळे या वर्षी तालुका व शहर प्रशासने “एक गाव,एक गणपती” या संकल्पनेचा अवलंब केला आहे.कोरोना विषाणूच्या साथीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी व सर्व पक्षीय नेत्यांनी त्याला उत्साह वर्धक पाठींबा दिला आहे.

शहरात श्री गणेशाच्या स्थापनेच्या वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,विनोद राक्षे,अनेक नगरसेवक,विविध सामाजिक संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते,सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते.या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच शहरात एक गाव एक गणपतीची संकल्पना साकार होत असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close