जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना बाधितांचा दर पुन्हा उंचावला !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत बारा रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या १२० अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ५० रुग्ण बाधित झाले आहे तर ७० संशयीत निरंक आले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यात नगर येथे पाठवलेले अहवाल प्राप्त झाले असून यात सुदैवाने कोणीही बाधित आढळले नाही.तर उपचारानंतर ३८ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून आज आलेल्या अहवालात शहरातील ३४ तर ग्रामीण भागातील १६ बाधित रुग्ण आढळले असून आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४५ झाली असून सक्रिय रुग्ण १९६ असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०६ हजार ४१९ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३० लाख ४९ हजार ८५५ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५६ हजार ८७२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ लाख ७१ हजार ९४२ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २१ हजार ९९५ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १५ हजार ९३५ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २१५ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत तीन दिवसापूर्वी सलग प्रतिदिन दोन असे चार मृत्यू झाले आहे.

दरम्यान आज आढळलेल्या बाधित रुग्णांत शहरातील कोर्ट रोड येथे दोन तरुण वय-२९,३१,तर एक महिला वय-२५,गांधीनगर पुरुष वय-४५,महिला वय-५९,दत्तनगर येथील तीन महिला व एक तरुणी वय-५५,२४,१७,महादेवनगर तरुण वय-२९,टिळकनगर तरुण-२७,शिवाजी रोड महिला वय-६५,काले मळा येथे पाच पुरुष बाधित आढळले असून त्यात दोन बालक आहे त्यांचे वय-४२,१४,४४,१४,३८ आहे.तर बाधित सात महिला आढळल्या असून त्यात दोन मुली आहेत त्यांचे वय-७०,४०,१३,१०,४०,३४,१९ आहे.याशिवाय विवेकानंदनगर येथे पुरुष वय-५७,हनुमान नगर पुरुष त्यात दोन तरुणांचा समावेश आहे.त्यांचे वय-१८,१४,७१ तर सुदेश टॉकीज जवळ एक महिला वय-५४ सुभाष नगर येथे पुरुष वय-३६, तर महिला वय-४५,निवारा पुरुष वय-३१,महिला वय-७५,५८,मोहिनीराजनगर येथे पुरुष वय-४२,आदी ३४ रुग्णांचा समावेश आहे.

या शिवाय आज आढळलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांत भोजडे पुरुष व तरुण वय-४८,२० तर एक बालक वय-४,कोकमठाण पुरुष वय-३८ आणि ३७,महिला वय-३२,संवत्सर येथे पुरुष वय-३३, मुर्शतपूर तरुण वय-२७,पढेगाव पुरुष वय-३८,धारणगाव महिला ५२,कोळपेवाडी महिला दोन वय-३५,५३,येसगाव महिला वय-२१ तर बोलकीचा तरुण वय-२५ आदीं १४ रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४५ इतकी झाली आहे.त्यात १९६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८६ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार १४३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १२ हजार ५७२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.०५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ४३७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६७.०७ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close