जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात नागरिकांचे प्राण वाचविण्यात अंहम भूमीका निभावणाऱ्या व उपचारात व स्वच्छतेच्या कामात बळी पडण्याची शक्यता असणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाने विमा संरक्षण कवच जाहीर करावे अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी संघटनेने एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतीच केली आहे.

सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.आरोग्य कर्मचारी व नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यासह विविध नगरपरिषदेचे कर्मचारी या नागरिकांना आपल्या जीवाची बाजी लावून मदत करत आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारीही त्याला अपवाद नाही.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३२७ ने वाढून ती २४ हजार ७७४ इतकी झाली असून ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ८१७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.आरोग्य कर्मचारी व नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यासह विविध नगरपरिषदेचे कर्मचारी या नागरिकांना आपल्या जीवाची बाजी लावून मदत करत आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारीही त्याला अपवाद नाही.त्यांनी हि दिव्यांग,बेघर व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू पुरविणे,त्या त्या शहरातील सर्व भागामध्ये फिरून बाहेरगावावरून आलेले व्यक्ती यांचे सर्वेक्षण करणे,विलगीकरणाचे हातावर शिक्के मारणे,दुकानाच्या ठिकाणी गर्दी होवू नये त्यादृष्टीने नियोजन करणे,औषध फवारणी करणे,स्वच्छता व साफसफाई आदी सर्व कामे अधिकारी, कर्मचारी हे रात्रंदिन करत असून त्यांना आतापर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात संरक्षण दिलेले नाही हे विशेष!

त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा विमा नाही.शासनाने इतर विभागा प्रमाणे नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांचा देखील विमा काढावा. इतर कोणत्याही सोई सुविधा नाहीत त्यामुळे कोरोना सारख्या महामारीत त्यातील अनेकजण नकळतपणे बाधित व्यक्तीच्या संपर्कात येत आहेत.अशातच एखाद्या कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली तर त्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे.मात्र त्यांना विमा कवच नसल्याने अनेकांच्या मनात अनाहूत भीती निर्माण झाली आहे. सर्वजण आपला जीव मुठीत धरून आपले कार्य करत असून या सर्वांना लवकरात लवकर विमा संरक्षण मिळावे म्हणून यापूर्वी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन वेळेस निवेदन दिलेले आहेत.मात्र त्याची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही.शासनाने दिनांक २६ एप्रिल पर्यंत कोणतीही दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यमध्ये नगरपरिषद,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी हे दिनांक २७ एप्रिल पासून काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार आहेत.या बाबत कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,सचिव प्रशांत चव्हाण यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.सदर प्रसंगी सुनील गोर्डे,विनोदकुमार पाटील,तुषार नालकर,भालचंद्र उंबरजे,राजेश गाढे,संजय तीरसे,गोविंद जवाद,सुरेश शिंदे,महारुद्र गालट,एकनाथ डाके, रवी वाल्हेकर,मीना कदम आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close