नगर जिल्हा
टाळेबंदीचे उल्लंघन करून स्थलांतर करणाऱ्यांवर होणार कारवाई !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात कोरोना विषाणूची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी शासनाने आता आणखी नियम कडक करण्याची भूमिका घेतली असून टाळेबंदीचे उल्लंघन करून एखाद्या व्यक्तीने जर स्थलांतर केले तर आता त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याची माहिती शिर्डी उपवीभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
नगर जिल्ह्यात ३३ तर कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकारी हि साथ थोपविण्यासाठी अधिक सतर्क झाले असून त्या साठी जे नागरिक आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले असतील त्या नागरिकांनी आहे तेथे थांबणे आवश्यक बनल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३२७ ने वाढून ती २४ हजार ७७४ इतकी झाली असून ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ८१७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकारी हि साथ थोपविण्यासाठी अधिक सतर्क झाले असून त्या साठी जे नागरिक आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले असतील त्या नागरिकांनी आहे तेथे थांबणे आवश्यक बनल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.अनेक नागरिक आपले वर्तमान ठिकाण सोडून आपले मूळगावी परतण्याचे प्रयत्नात आहे.काही रात्री-अपरात्री गावात कोणालाही न सांगता व पूर्व परवानगी न घेता गावात प्रवेश करत आहेत त्यामुळे मूळ ग्रामस्थांना व त्यांच्या आरोग्यास धोका वाढलेला आहे.परिणामस्वरूप आता आपले स्थान सोडून जे गावात,महापालिका,नगरपरिषद हद्दीत,एखाद्या हॉटेल,लॉज यादीत प्रवेश करतील जे नातेवाईक त्यांना आश्रय देतील त्यांच्यावर भा.द.वि.कलम १८८,२६९,२७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहितीही पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी शेवटी दिली आहे.त्यामुळे शहराकडून आपल्या गावात पळणाऱ्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.