जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

विदयार्थीनी आपले ध्येय निश्चित नंतर यश हमखास-उभारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

विदयार्थीनी आपले ध्येय निश्चित नंतर यश हमखास मिळत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी एस.एस.सी.मार्च परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थींना व क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडुंचा पारितोषिक देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.प्राथमिक विभागाच्या शिक्षिका संगिता मालकर यांना नुकताच राज्य शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला म्हणून शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा शालेय व वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पुणे येथील सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी हे बोलत होते.

सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,संदीप अजमेरे,राहुरीचे शालेय षोषण आहार अधिक्षक श्री.साळुंके,प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका मिना पाटणी,भागचंद माणिकचंद इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य मकरंद निमोणकर,वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे,के.बी.पी.विदयालयांचे मुख्याध्यापक सुरेश कातकडे,दिलीप तुपसैंदर,महाराष्ट्र बॕकेचे स्वप्निल मालपुरे,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”खडतर परीश्रमा शिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट करुन ध्येय निश्चित करुन वाटचाल करा म्हणजे यश मिळेल.ही भूमी साईबाबाची असुन त्यांचा श्रध्दा व सबुरी चा मुलमंत्र जीवनात पाळा.ग्रामीण भागातील मुलांनी शहरात शिक्षण घेताना आत्मविश्वाने सामोरे जावे न्युनगंड बाळगू नये असे सुचविले. समाजात आपले स्थान निर्माण करुन परत शाळेत पाहुणे म्हणून या असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी अविनाश कुलकर्णी म्हणाले की,”आपण या शाळेचा माजी विद्यार्थी असुन माझ्या यशामध्ये विदयालयाचा मोठा वाटा आहे असे स्पष्ट केले.चांगले संस्कार देवुन आदर्श विदयार्थी घडविण्याचे चांगले कार्य विदयालया मध्ये होत आहे असे म्हणाले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.विदयालयांचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय करुन दिला.विदयालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी अहवालाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.ए.अजमरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रघुनाथ लकारे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close