जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेची परसबाग ठरली प्रेरणादायी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील रवंदे येथील पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेने प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियानांतर्गत स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून पाच हजारांचे बक्षीस प्राप्त केले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   

पी.एम.श्री.शाळा योजना ही केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे,ज्याअंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन.इ.पी.) २०२० नुसार देशातील १४ हजार ५०० हून अधिक सरकारी शाळांना आधुनिक आणि आदर्श शाळा म्हणून विकसित केले जात आहे.

   पी.एम.श्री.शाळा योजना ही केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे,ज्याअंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन.इ.पी.) २०२० नुसार देशातील १४ हजार ५०० हून अधिक सरकारी शाळांना आधुनिक आणि आदर्श शाळा म्हणून विकसित केले जात आहे.या शाळांमध्ये हरित ऊर्जा (सौरऊर्जा),डिजिटल वर्गखोल्या,प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना २१ व्या शतकासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक पटकावला त्यावेळी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी भेट दिली तो क्षण.

   इयत्ता एल.के.जी.ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या या शाळेत विविध प्रकारचा भाजीपाला व फळझाडांनी समृद्ध अशी परसबाग विकसित करण्यात आली आहे,टोमॅटो,वांगे,कोबी,फ्लाॅवर,शेवगा आदी पिकांची लागवड विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मेहनतीने परसबाग उभी करुन तिची नियमित निगा राखली आहे.सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर शाळेतील पोषण आहारात करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना ताजे व पौष्टिक अन्न मिळत आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्काराची जाणीव निर्माण झाली असुन सेंद्रिय शेतीचे महत्व त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातुन आत्मसात केले आहे.

    या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे,उपाध्यक्ष ज्योती कदम,मुख्याध्यापक प्रभाकर कदम व शिक्षक सुनिता गायकवाड,अशोक कानडे,दत्तात्रय गरुड,दत्तात्रय राऊत,चंद्रकला डांगे,संगिता बोधक,उन्नती मोरे,आशा इल्हे,पल्लवी पवार,जयदिप कदम,शिला काळे,कोमल लामखडे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,विस्तार अधिकारी संजीवनी आंबिलवादे,केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे,गावातील पदाधिकारी,ग्रामस्थ व पालक आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close