जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

…या तालुक्यात पावसाने मोठे नुकसान,भरपाईची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळाने पूर्वभागासह उत्तर भाग झोडपून काढला असून अनेक झाडे जमीनोध्वस्त झाली असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहे तर कुक्कुट पालन शेडचे मोठे नुकसान झाले असल्याचे माहिती हाती आली आहे.या वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वादळी पावसाने मौजे कोकमठाण येथील घराचे झालेले नुकसान.

दरम्यान बहादरपूर हद्दीत काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून दोन कच्च्या घरांचे पत्रे उडाले आहे.मात्र सुदैवाने तर वेस धोंडेवाडी आदी ठिकाणी काही घरे,त्यांच्या भिंती कांदा चाळी,गाय गोठे आदींचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.

 

  राज्याच्या हवामान खात्याने यावर्षी कमी पावसाचे अनुमान केले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उशिरा मान्सून पावसाने हजेरी लावली आहे.गतवर्षी 07 मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.यावर्षी उशिरा 06 दिवसाने म्वादळी हजेरी लावली असून त्यात मायगाव देवी येथील महिला मीराबाई सुरेश थोरात या वीज पडून जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या तर त्याच भागात विश्वास कोंडाजी जाधव यांची म्हैस वीज पडून ठार झाली होती.तर धामोरी येथील प्रकाश बळवंत कांबळे यांची एक गाय मृत्यूमुखी पडली होती.सांगवी भुसार येथील किसन कचरू पवार व गोरक्ष कचरू पवार यांचे घरची तर सांगवी भुसार येथील निलेश नारायण जाधव यांचे कुक्कुटपालन शेडची पडझड झाली होती.त्यानंतर अवकाळी पावसाने काल 22 मे रोजी सायंकाळी कोपरगाव,राहाता तालुक्यात हजेरी लावली आहे.मात्र ही आगंतुक सलामी शेतकरी,कुक्कुटपालक,पशुपालक यांना चांगलीच अडचणीत आणणारी आणि मुळावर उठणारी ठरली आहे.सर्वाधिक नुकसान शिरसगाव आणि तिळवणी परिसरात झाले असून यात शिरसगाव येयील ग्रट क्रमांक 214/3 मधील मेहमूद अहमद शेख यांच्या घराची भिंत पडली असून समोरची पडवी पूर्णतः उध्वस्त झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

 

तळेगाव मळे येथील मंदा मंजाहरी वैद्य यांचे कांदाचाळीची झालेली दुरावस्था.

  कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळाची सुरुवात काल सायंकाळी तळेगाव मळे,खिर्डी गणेश परिसर या ठिकाणी झाली असल्याचे दिसून आले आहे.त्या ठिकाणी मंदा मंजाहारी वैद्य यांच्या घरावर व कांद्याच्या चाळीवर झाड कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर धोत्रे येथील उत्तम  निवृत्ती वैद्य यांच्या कांदा चाळीस अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत कांद्यासह चाळ भस्मसात झाली आहे.

धोत्रे येथील उत्तम  निवृत्ती वैद्य यांच्या कांदा चाळीस अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत कांद्यासह चाळ भस्मसात झाली असल्याचे दिसून येत आहे.

   तळेगाव मळे,खोपडी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.याशिवाय सुरेगाव येथील अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे व फळ संरक्षक कवचाचे मोठे नुकसान झाले आहे.

खिर्डी गणेश येथील शब्बीर शेख यांच्या पोल्ट्रीची झालेली वाताहत.

   दरम्यान कासली हद्दीत गट क्रमांक 46/3 मधील मनोज देवराम पवार यांचे घराचे छत आणि भिंत आदींचे मोठे नुकसान झाले आहे.त्यात घरातील चीजवस्तूचे मोठे नुकसान झाले आहे.तर मढी बुद्रुक येथील सुनील बाबासाहेब चव्हाण यांचे घराचे पत्रे उडाले असून त्याच्या भिंती पडल्या असल्याची  माहिती महसूल विभागाने दिली आहे.तर खिर्डी गणेश येथील शब्बीर सांडू शेख यांच्या कुक्कुट पालन शेडचे पत्रे कोसळले आहे.त्यामुळे पक्षी कोठे ठेवायचे याची चिंता त्यांना निर्माण झाली आहे.

कासली येथील शेतकरी मनोज देवराम पवार यांचे घराची वादळाने झालेली दुरावस्था.

   दरम्यान बहादरपूर हद्दीत काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून दोन कच्च्या घरांचे पत्रे उडाले आहे.मात्र सुदैवाने तर वेस धोंडेवाडी आदी ठिकाणी काही घरे,त्यांच्या भिंती कांदा चाळी,गाय गोठे आदींचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शिरसगाव येथील मेहमूद शेख यांचे घराची भिंत पडली त्यावेळी कुटुंबांची चिंता दिसत आहे.

   कोकमठाण,मंजूर हंडेवाडी,करंजी,ओगदीं,दहेगाव बोलका,लोकी,भोजडे, पढेगाव,मळेगांव थडी,सांगवी भुसार,ब्राम्हणगाव,टाकळी,धामोरी,मोर्विस,मायगाव देवी,सोनारी,धारणगाव,रवंदे,कुंभारी,हिंगणी,येसगाव,नाटेगाव,अंचलगाव,माहेगाव देशमुख,अंजनापूर,रांजणगाव देशमुख,मनेगाव,कारवाडी,वडगाव,बक्तरपूर,वेळापूर,जेऊर कुंभारी, डाऊच,आदी ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता मोठे नुकसान झाले असल्याची खबर नाही.मात्र आजही दुपारी पावसाने मोठे काहूर केले होते.मात्र अद्याप नुकसान झाल्याची अधिकृत खबर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close