जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

वादळाचा प्रताप,माध्यमिक शाळेचे पत्रे उडाले !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

     कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस सुमारे तीस कि.मी.असलेल्या धामोरी येथे परवा सायंकाळी आलेल्या वादळाने रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून त्यात पडवीचे पत्रे उडालेच पण पडवीचे लाकडी खांब मोडून पडले असल्याने आता आगामी काळात माध्यमिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची पंचाईत झाली असल्याची बाब उघड झाली आहे.त्यामुळे विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मृगाच्या वादळाने परवा धामोरी येथील माध्यमिक शाळेचे झालेले नुकसान छायाचित्रात दिसत आहे.

सदर घटनेत वादळाने शाळेच्या पदवीचे पत्रे उडून गेले असून त्याच पदवीचे लाकडी खांबही उन्मळून पडले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे शिक्षण संस्थेचे विद्यार्थी,पालक.समितीचे पदाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत नुकसानीचा अहवाल रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे निरीक्षक यांना पाठवले असल्याची माहिती स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली आहे.

  राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळं शेती पिकांचं विशेषत: फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील वायव्येस धामोरी,रवंदे कोळगाव थडी,सांगवी भुसार,टाकळी,मंजूर आदी ठिकाणी काल सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत त्यांनी दिली असताना आज धामोरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या,’न्यु इंग्लिश स्कूल’ या माध्यमिक शाळेचे वादळाने मोठे नुकसान केले असल्याची माहिती स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली आहे.

   सदर घटनेत वादळाने शाळेच्या पदवीचे पत्रे उडून गेले असून त्याच पदवीचे लाकडी खांबही उन्मळून पडले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे शिक्षण संस्थेचे विद्यार्थी,पालक.समितीचे पदाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत नुकसानीचा अहवाल रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे निरीक्षक यांना पाठवले आहे.व त्यांना लवकरात लवकर इमारतीच्या दुरूस्तीची विनंती केली असल्याची माहिती स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close