नैसर्गिक आपत्ती
अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा -…या नेत्याच्या सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळाने पूर्वभागासह उत्तर भाग झोडपून काढला असून अनेक झाडे जमीनोध्वस्त झाली असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहे तर कुक्कुट पालन शेडचे मोठे नुकसान झाले असल्याचे माहिती हाती आली आहे.या वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आशुतोष काळे यांनी अपग्रस्तांची भेट घेऊन आज केली आहे.

“मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अशा कठीण प्रसंगी शासन व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तुम्ही चिंता करू नका अशी ग्वाही देवून नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्याच्या हवामान खात्याने यावर्षी कमी पावसाचे अनुमान केले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उशिरा मान्सून पावसाने हजेरी लावली आहे.गतवर्षी 07 मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.यावर्षी उशिरा सहा दिवसाने म्वादळी हजेरी लावली असून त्यात मायगाव देवी येथील महिला मीराबाई सुरेश थोरात या वीज पडून जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या तर त्याच भागात विश्वास कोंडाजी जाधव यांची म्हैस वीज पडून ठार झाली होती.तर धामोरी येथील प्रकाश बळवंत कांबळे यांची एक गाय मृत्यूमुखी पडली होती.सांगवी भुसार येथील किसन कचरू पवार व गोरक्ष कचरू पवार यांचे घरची तर सांगवी भुसार येथील निलेश नारायण जाधव यांचे कुक्कुटपालन शेडची पडझड झाली होती

त्यानंतर अवकाळी पावसाने काल 22 मे रोजी सायंकाळी कोपरगाव,राहाता तालुक्यात हजेरी लावली आहे.मात्र ही आगंतुक सलामी शेतकरी,कुक्कुटपालक,पशुपालक यांना चांगलीच अडचणीत आणणारी आणि मुळावर उठणारी ठरली आहे.सर्वाधिक नुकसान शिरसगाव आणि तिळवणी परिसरात झाले असून यात शिरसगाव येयील शेतकरी मेहमूद अहमद शेख यांच्या घराची भिंत पडली असून समोरची पडवी पूर्णतः उध्वस्त झाली असल्याची माहिती हाती आली आहे.वादळाची सुरुवात परवा सायंकाळी तळेगाव मळे या ठिकाणी झाली असल्याचे दिसून आले आहे.त्या ठिकाणी मंदा मंजाहारी वैद्य यांच्या घरावर व कांद्याच्या चाळीवर झाड कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर धोत्रे येथील उत्तम निवृत्ती वैद्य यांच्या कांदा चाळीस अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत कांद्यासह चाळ भस्मसात झाली आहे.तळेगाव मळे,खोपडी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.याशिवाय सुरेगाव येथील अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे व फळ संरक्षक कवचाचे मोठे नुकसान झाले आहे.याचे वृत्त न्यूजसेवा ने प्रसिद्ध केले होते.त्याची दखल कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे यांनी घेतली असून आज तालुक्यातील विविध ठिकाणची पाहणी केली असून प्रशासनाला स्थळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले आहे.

यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते तसेच तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याकडून नुकसान ग्रस्तांच्या पंचनाम्याबाबतची माहीती जाणून घेतली असल्याचे दिसून आले आहे.मतदार संघातील ज्या गावात नुकसान झाले आहे त्या सर्व नुकसानीचे वेळत पंचनामे पूर्ण करून शासनाकडे त्वरित अहवाल सादर करा व पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त नागरीक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी काळजी घ्या अशा सूचना केल्या आहेत.यापूर्वीही नैसर्गिक संकटात महायुती शासनाकडे केलेल्या पाठ्पुराव्यातून नुकसानग्रस्तांना समाधानकारक नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.त्याप्रमाणे याहीवेळेस झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे पाठपुरावा करून महायुती शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.



