जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

डासांच्या विळख्यात शहर सापडले-..यांचा आरोप

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर गेल्या काही महिन्यापासून गटारी तुंबल्या असून परिणामी शहर दुर्गंधी आणि डासांच्या विळख्यात सापडले असून डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदन देऊनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

विजय त्रिभुवन.

  

“कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक कामे सत्ताधारी करताना दिसत नाही.शहरात अनेक नाले तुबलेले असून सांडपाणी नाल्यांच्या वरून वाहत आहे.तहे घाण पाणी साचू लागल्याने डासांचे साम्राज्य तयार झाले आहे.उन्हाळ्याचे दिवस त्यात प्रचंड उष्णता असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.परिणामी लहान मुले आणि ज्येष्ठांना डेंग्यू,मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढला आहे”-विजय त्रिभुवन,कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस.

    त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेले मुलभूत कामेही सत्ताधारी करताना दिसत नाही.शहरात अनेक नाले तुबलेले असून सांडपाणी नाल्यांच्या वरून वाहत आहे.त्यामुळे हे घाण पाणी साचू लागल्याने डासांचे साम्राज्य तयार झाले आहे.नाल्यांवर ढापे टाकले जात नसल्याने शहरातील अनेक भागांत दुर्गंधी पसरलेली आहे.त्यात उन्हाळ्याचे दिवस प्रचंड उष्णता असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.या परिस्थितीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना डेंग्यू,मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.तरीही नगरपरिषदेकडून दखल घेतली जात नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे.

  वर्तमानात नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवक अजूनही हारतुरे घेण्यात आणि आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात व्यस्त असल्याचा दावा केला आहे.निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेले शब्द पूर्ण करायचे सोडून काम कमी आणि गाजावाजा जास्त करीत आहे.जेवढा गाजावाजा करीत आहे तेवढेच लक्ष देऊन शहरातील सगळ्याच प्रभागातील नाले साफ करणे गरजेचे आहे.शहरातील रोगराई कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित कसे राहील यासाठी सत्ताधाऱ्यांनी कामाचा गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामे करावीत असे आवाहन शेवटी विजय त्रिभुवन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close