कोपरगाव शहर वृत्त
पाण्याच्या नासाडी वरून कोपरगावात आरोप प्रत्यारोप !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांना चार दिवसांनी मिळणारे पाणी पाच ते सहा दिवसांनी मिळायला असून एकीकडे पाईप लाईनला होणारी गळती तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्या ओव्हफ्लो होवून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.त्यामुळे तुम्ही लाखो लिटर पाण्याची नासाडी करायची आणि पाणी फक्त नागरीकांनीच जपून वापरायचे का? असा सवाल कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेद्र वाकचौरे यांनी कोपरगावकरांच्या वतीने सत्ताधारी गटाला विचारला आहे.त्यामुळे आगामी काळात पाण्यावरून शहरात चांगलाच शिमगा रंगणार असल्याचे संकेत मिळू लागले असल्याचे दिसत आहे.

दरम्यान याला आ.कोल्हे गटाच्या पाणी पुरवठा सभापती यांनी उत्तर दिलं असून त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा तळाला गेल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे.धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुढील आवर्तन होईपर्यंत तसेच नैसर्गिकरीत्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढेपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. या वस्तुस्थितीला विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असून तो दुर्दैवी आहे”-वैशाली वाजे,पाणीपुरवठा सभापती, कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगावसह राज्यात पावसाने हुलकावणी दिली असून राजाच्या जलसंपदा विभागाने शेतीसिंचनाचे पाणी थांबवून ते पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवले आहे.त्यामुळे आगामी काळात अजूनही पावसाचा नक्कीच कोणालाही अंदाज नसल्याने पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून त्यावरून आगामी काळात पाण्यावरून चांगलाच शिमगा साजरा होणार असे संकेत मिळू लागले आहे.त्याची चाहूल कोपरगाव नगरपरिषद हद्दीत लागली असून कोपरगाव शहराला पाण्याचे चटके बसू लागले असून पाणी कमी आणि पाणी आणि घरपट्टी वाढण्याचा घाट घातला जात असून राष्ट्रवादी अजित पवार गटाने याची संधी न हेरली तर नवल होते.त्यांनी हा मुद्दा हेरला असून त्यावर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात केली आहे.आजच याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेद्र वाकचौरे यांनी आरोप करून आरोपांची धुरळा उडवून दिला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवारी दि.२२ रोजी सकाळी १० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.त्यामुळे आगामी काळ हा सत्ताधाऱ्यांना कठीण जाणार अशी चिन्हे आहेत.
त्यांची याबाबत म्हटलं आहे की,”जून महिना सुरु होवून जवळपास तीन आठवड्याचा कालावधी होत असून अद्यापही कुठेही पाऊस झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यंत शिल्लक पाणी साठा जपून वापरणे हि नागरीकांसह कोपरगाव नगरपरीषदेची देखील जबाबदारी आहे.मात्र अशा कठीण परिस्थितीचे कोपरगाव नगरपरीषदेला कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.एका महिन्यात पाचही साठवण तलाव रिकामे करूनही नागरीकांना नियमित पाणी पुरवठा न करू शकणारे सत्ताधारी लक्ष्मीनगर परिसरातील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असतांना दुर्लक्ष करून नागरिकांच्या हक्काचे लाखो लिटर पाणी वाया घालवत आहे.
एका महिन्यात साठवण तलावांनी तळ गाठल्यामुळे नागरीकांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी आ.काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला सूचना दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन देण्यात आल्यामुळे अडचणी दूर झाल्या असल्या तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा काटकसरीने उपयोग होणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असतांना त्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता पाणी फक्त नागरिकांनीच जपून वापरायचे का ? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला असल्याचा दावा केला आहे.एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरायला सांगायचे आणि दुसरीकडे तुम्ही लाखो लिटर पाण्याची नासाडी करून नागरीकांना पाणी पुरवठा करतांना पाणी पुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ करायची असा शिरस्ता बनत असल्याचा आरोप केला आहे.तुमच्या निष्काळजीपणामुळे संकटकालीन परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे याची जबाबदारी घेवून कोपरगावकरांना पाणी बचतीचे धडे देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या गलथानपणामुळे कोपरगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी असे राजेंद्र वाकचौरे यांनी शेवटी म्हटलेआहे.



