जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

खोटा धनादेश देऊन फसवणूक,कोपरगावात आरोपीला शिक्षा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतीनिधी)

कोपरगाव शहरातील डाळिंबाचे व्यापारी आरोपी संभाजी बाबुराव घागरे याने तीन वर्षांपूर्वी धोत्रे येथील शेतकरी विजय जयराम जामदार यांचेकडून डाळिंब खरेदी करून त्या पोटी धनादेश प्रदान केला होता.मात्र तो धनादेश वटला नाही.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव येथील न्यायालयात दावा दाखल केला होता.त्याचा निकाल नुकताच हाती आला असून यातील आरोपीस कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एम.पांचाळ यांच्या न्यायालयाने आरोपीस तीन महिन्याची शिक्षा व ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.त्या मुळे शेतकरी वर्गास दिलासा मिळाला आहे.

छायाचित्र-नानासाहेब जवरे

सदरच्या दाव्यात साक्षी पुरावे यांची तपासणी होऊन कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एम.पांचाळ यांनी नुकताच आरोपी संभाजी घागरे यास शेतकरी जामदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.व ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.नुकसान भरपाईची रक्कम मुदतीत न भरल्यास त्यांना पुन्हा पंधरा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शेतकरी हे धोत्रे येथील रहिवासी असून त्यांचा डाळिंब शेतीचा व्यवसाय आहे.त्यांनी आपल्या शेतात डाळिंब शेती पिकवली होती.व पीक बहारास आल्यावर त्याचा सौदा कोपरगाव येथील डाळिंब व्यापारी संभाजी घागरे यांचेशी केला होता.त्यांच्यात व्यवहार पार पडून याची रक्कम व्यापारी देय लागत होता.त्या पोटी त्याने शेतकरी जामदार यांना धनादेश प्रदान केला होता.मात्र सदरचा धनादेश बँक खात्यात भरला असता तो वटला नाही.त्यामुळे शेतकरी विजय जामदार यांनी या प्रकरणी आरोपी व्यापारी संभाजी घांगरे याचे विरुद्ध एन.आय.ऍक्ट कलम १३८ प्रमाणे कोपरगाव येथील न्यायालयात धाव घेऊन अड्.अशोक टुपके यांचे मार्फत दावा दाखल केला होता.

सदरच्या दाव्यात साक्षी पुरावे यांची तपासणी होऊन कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एम.पांचाळ यांनी नुकताच आरोपी संभाजी घागरे यास शेतकरी जामदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.व ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.नुकसान भरपाईची रक्कम मुदतीत न भरल्यास त्यांना पुन्हा पंधरा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

सदरच्या दाव्यामुळे फसवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.या प्रकरणी फिर्यादी शेतकरी यांच्या वतीने अड्.अशोक टुपके यांनी काम पहिले आहे.त्यांना अड्.माधुरी काटे यांनी सहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close