निधन वार्ता
निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते खालकर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम सुरु करण्यासाठी उभारलेल्या आंदोलनास मोठे बळ देणारे रांजणगाव देशमुख येथील कार्यकर्ते दिलीप लहानु खालकर (वय-५१) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या दारू कारखान्यासाठी अपूर्ण ठेवणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातील गोदावरी व प्रवरा काठच्या नेत्यांना आव्हान देणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने या बाबत गत पंधरा वर्षांपासून रस्त्यांवरील लढा उभारून सरकारी दरबारी व उच्च न्यायालयातून न्याय मिळवला व तीन वर्षांपूर्वी न्याय मिळवून कालव्यांचे काम मोठ्या वेगाने सुरु केले.त्यात अनेक कार्यकर्त्यानी योगदान दिले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील दिलीप लहानु खालकर यांचे मोठे योगदान होते.
निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले मात्र गत बावन्न वर्ष कालवे जाणीव पुर्वक आपल्या दारू कारखान्यासाठी अपूर्ण ठेवणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातील गोदावरी व प्रवरा काठच्या नेत्यांना आव्हान देणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने या बाबत गत पंधरा वर्षांपासून रस्त्यांवरील लढा उभारून सरकारी दरबारी व उच्च न्यायालयातून न्याय मिळवला व तीन वर्षांपूर्वी न्याय मिळवून कालव्यांचे काम मोठ्या वेगाने सुरु केले.त्यात अनेक कार्यकर्त्यानी योगदान दिले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील दिलीप लहानु खालकर यांचे मोठे योगदान होते.त्यांनी तळेगाव दिघे,पिंप्री निर्मळ,राहाता,कोपरगाव,संगमनेर आदी ठिकाणी केलेल्या आंदोलनात मोठे योगदान दिले होते.त्यांच्यावर काळाने नुकताच घाला घातला आहे.
त्यांना रविवार दि.३० रोजी अस्वस्थ वाटू लागले होते.त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.पण त्यांची तत्पूर्वीच प्राण ज्योत मालवली होती.त्यांच्यावर खालकर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात एक भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष सोन्याबापू उऱ्हे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,गंगाधर रहाणे,नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,अड्.योगेश खालकर,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,तान्हाजी शिंदे सर,ज्ञानेश्वर शिंदे गुरुजी,आदींनी दुःख व्यक्त केले आहे.