जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या ‘ जमिनीसाठी आता उद्यापासून उपोषण होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरानजीक असलेल्या साईबाबा चौक परिसरात असलेली महार वतनाची ५०.३३ एकर जमीन परस्पर वाटून घेणाऱ्या आणि ०१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून त्या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी नगरपरिषद आणि महसूल विभागाला जाग आणण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी उद्या मंगळवार दि.26 मे रोजी डॉ.आंबेडकर स्मारकासमोर बेमुदत उपोषण जाहीर केले असल्याची माहिती प्रकाश सुकदेव दुशिंग,बाबासाहेब भास्कर कोपरे यांनी दिली आहे.

महार वतनाच्या 50.33 एकर जागेत अतिक्रमण होऊन त्याजागी वर्तमानात गांधी प्रदर्शन सभामंडप,कार्यालय,पुतळे,अग्निशामक स्थानक,शाळा,व्यापारी संकुले असा बराच मोठा लवाजमा उभारला असल्याने यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.त्यातच या शेतकऱ्यांनी आता संघर्ष करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी ही आपली वडिलोपार्जित जमिनीसाठी आता उद्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकाळी 10 वाजता उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रकाश दुशिंग यांनी  दिली आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांक आमच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.हे आमचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र आहे हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच पण सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे.वर्तमानात केलेल्या तक्रारीत आम्ही केलेल्या पुराव्यात मंडलाधिकारी यांनीही ही जमीन महार वतनाची म्हणजेच आमच्या वाली वारसांची असल्याचा अहवाल दिला आहे.दुशिंग व कोपरे हे त्याचे कायदेशीर वारस आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.मात्र १९२० ते १९३० च्या दरम्यान हे सर्व गट क्रमांक एकत्र करून त्याला सिटी सर्व्हे क्रमांक १९३५ हा दिला असून आमचा कायदेशीर हक्क डावलला गेला असल्याचा आरोप केला आहे.या जमिनीचे ०१ ते १७ प्लॉट पाडून ते खिरापती सारखे इतर असंबंध नागरिकांना वाटून दिले आहेत.यातील काही जमीन जिल्हाधिकारी यांनी १६ जुलै १९५१ रोजी १००/१०० मीटर ही जागा महार बोर्डिंग साठी आरक्षित केली असल्याचे (आज त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय आहे) त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.ती तत्कालीन मंत्र्यांना हाताशी धरून बळकावली आहे.तर १९७१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अवैध आदेश देऊन ती जागा सि.टी.एस.क्रमांक २११३ देऊन हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे.याबाबत आम्ही मागणी केल्यावर अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी दि.०६ सप्टेंबर २०२४ रोजी चौकशीचे आदेश दिले असल्याचे कळवले आहे.

आंदोलन करताना महार वतनाचे खरे लाभार्थी शेतकरी दिसत आहे.

  कोपरगाव मंडलाधिकारी यांनी दिनाक १७ ऑक्टोबर २०२४ च्या केलेल्या चौकशीत सदर बाब अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भान्वये साबित झाला असल्याचा दावा केला आहे.पूर्वी १४ ऑक्टोबर २०१३ जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत ही बाब सिद्ध झाला असल्याचा दावा केला आहे.भूमी अभिलेख यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली असल्याने आता ज्यांच्या ताब्यात ही जमीन आहे त्यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे उघड झाले आहे.त्याजागी आता वर्तमानात गांधी प्रदर्शन सभामंडप,कार्यालय,पुतळे,अग्निशामक स्थानक,शाळा,व्यापारी संकुले असा बराच मोठा लवाजमा असल्याने यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.त्यातच या शेतकऱ्यांनी आता संघर्ष करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी ही आपली वडिलोपार्जित जमिनीसाठी आता उद्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकाळी 10 वाजता उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रकाश सुकदेव दुशिंग,बाबासाहेब भास्कर कोपरे,देविदास गायकवाड,संतोष कोपरे यांचेसह संबंधितांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   याबाबत त्यांनी निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,तहसीलदार,पोलिस अधिकारी आदींना दिल्या आहेत.कोपरगाव नगरपरिषदेने याबाबत त्यांच्या पत्रव्यवहाराला उत्तर दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यामुळे आगामी काळात या जमिनीसाठी संघर्ष होणार असल्याची संकेत मिळत आहेत.या घडामोडीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close