जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अज्ञात तरुणाचा मृत्यू,घात की अपघात चर्चांना उधाण!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील तीनचारी परिसरात एका अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.त्याबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

“कोपरगाव,शिर्डी परिसरात परप्रांतीयांची कामाच्या शोधात मोठी आवक सुरू असते.यात काही रोजंदारीच्या शोधत येतात तर काही गुन्हे करण्याच्या हेतूने आलेले आढळून आलेले आहे.रेल्वे विमानसेवा आदी आधुनिक सुविधांमुळे यात आणखी भर पडली आहे.काही तर विमानाचा सेवेचा वापर आठवडाभर गुन्हे करून फरार होणारे आढळून आले आहे.तर परिणामी गुन्हेगारीचा आलेखही वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीच्या मर्यादा येताना दिसून येत आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की,”कोपरगाव,शिर्डी परिसरात परप्रांतीयांची कामाच्या शोधात मोठी आवक सुरू असते.यात काही रोजंदारीच्या शोधत येतात तर काही गुन्हे करण्याच्या हेतूने आलेले आढळून आलेले आहे.रेल्वे विमानसेवा आदी आधुनिक सुविधांमुळे यात आणखी भर पडली आहे.काही तर विमानाचा सेवेचा वापर आठवडाभर गुन्हे करून फरार होणारे आढळून आले आहे.तर परिणामी गुन्हेगारीचा आलेखही वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीच्या मर्यादा येताना दिसून येत आहे.नुकत्याच एका घटनेत जेऊर कुंभारी शिवारात जुनी जिल्हा बँक शाखा परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मयत इसमाच्या शरीरावर ठीकठिकाणी जखमा असल्याचे समोर आल्याने हा प्रकार अपघात आहे की,घातपात की;अन्य काही,याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली  असल्याची माहिती हाती आली आहे.

  आज रविवार दि.१७ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला आहे.त्यानंतर गृहरक्षक दलाचे जवान अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र,हा अपघाती मृत्यू आहे की,इतर कोणता प्रकार आहे याबाबतचा उलगडा पोलीस तापसानंतर स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close