जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

प्रदीप चिने यांचे निधन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव नजीक असलेल्या सहजानंदनगर येथील गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संचाचे गॅरेज विभागाचे कर्मचारी प्रदीप कोंडाजी चीने (वय -52 वर्षे) यांचे आज सकाळी 10.20 वाजता दुःखद निधन झाले आहे.त्यांचे पश्चात आई,एक भाऊ,चार बहिणी,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.ते गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे माजी संचालक स्व.द्यानदेव पाटील टुपके यांचे जावई होते.

स्व.प्रदीप चीने यांचे छायाचित्र.

  स्व.प्रदीप चीने हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून गोदावरी दूध संघात परिचित होते.त्यांनी आपल्या स्वभावाने अनेक माणसे जोडली होती.काही दिवसापासून ते अत्यवस्थ होते.त्यांचेवर उपचार सुरू असताना आज सकाळी 10.20 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

   स्व.प्रदीप चीने हे मूळ मानोरी तालुका येवला येथील रहिवासी होते.ते मनमिळावू स्वभावाचे म्हणून गोदावरी दूध संघात परिचित होते.त्यांनी आपल्या स्वभावाने अनेक माणसे जोडली होती.काही दिवसापासून ते अत्यवस्थ होते.त्यांचेवर उपचार सुरू असताना आज सकाळी 10.20 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे सायंकाळी 6.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीनै दिली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,मढी येथील संजय श्रीपाद गवळी,ताहाराबाद येथील संत महिपती महाराज ट्रस्टचे माजी सचिव बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close