निधन वार्ता
संभाजी मगर यांना बंधुशोक

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व प्रगतशील शेतकरी संभाजी भाऊसाहेब मगर यांचे बंधू व ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी भाऊसाहेब मगर (वय-52) यांचें नुकतेच आज दुपारी 01 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी स्वाती मगर,एक मंथन नावांचा मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.शिवाजी मगर यांनी आपल्या काळात आपल्या सेवने अनेक माणसे जोडली होती.ते मितभाषी म्हणून ओळखले जात.त्यांच्या निधनाबद्दल संवत्सर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व.शिवाजी मगर यांनी आपल्या काळात आपल्या सेवने अनेक माणसे जोडली होती.ते मितभाषी म्हणून ओळखले जात.त्यांचे काम काही ठिकाणी वादग्रस्त ठरले होते.त्यांच्यावर संवत्सर हद्दीतील गोदावरी नदी काठी आज सायंकाळी 06 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष न्यानेश्वर परजणे,बाजार समितीचे संचालक खंडू फेफाळे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



