जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

औषध घेऊन एकाची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात मयत इसम संजय रामसिंग परदेशी (वय-४६) याने दि.२२ जुलै रोजी अज्ञात औषध प्राशन करून आपली इहलोकीची यात्रा संपवली आहे.त्यामुळे धारणगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी लोणी पोलिसानी अकस्मात मृत्यूची शून्य क्रमांकाने नोंदणी करून तो कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.घटनास्थळी कोपरगाव येथील पोलीस अधिकारी जाधव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व सहाय्यक फौजदार आंधळे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.भार्गव यांनी अकस्मात मुत्युची नोंदणी दाखल केल्याने धारणगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत हा कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी आहे.त्याने वरील तारखेस आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणानें विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.सदर बाब दुसऱ्या दिवशी घरातील सदस्यांच्या लक्षात आली त्यांनी उपचारार्थ लोणी येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल केले होते.तेथे उपचार सुरु असताना सदर इसमाचे निधन झालं आहे.

या प्रकरणी लोणी पोलिसानी अकस्मात मृत्यूची शून्य क्रमांकाने नोंदणी करून तो कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.घटनास्थळी कोपरगाव येथील पोलीस अधिकारी जाधव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व सहाय्यक फौजदार आंधळे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५२/२०२२ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close