जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू उपसा,५.१० रुपयांची मालमत्ता जप्त,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी नदीतून पात्रातून अवैध वाळूउपसा करण्यात प्रतींबंध असताना सुद्धा कोपरगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाल्याने त्यांनी केलेल्या कारवाईत देर्डे फाटा ते कोळपेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर मढी शिवारात विना क्रमांकाचा एक निळ्या ट्रॅक्टर व त्याच रंगाची ट्रॉली जप्त केली असून त्यात विना परवाना अवैध वाळू आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी तुषार राजेंद्र रोकडे (वय-२०) माहेगाव देशमुख,गणेश काटे,विकी सरोदे दोघे रा.कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील सुमारे ५.१० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मुद्देमालासह आरोपी व पोलीस अधिकारी दिसत आहे.

जिल्हा गुन्हे शाखेस याबाबत गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली होती की,”कोपरगाव तालुक्यातील गोदावरी निधीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे.त्यानुसार पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांनी या ठिकाणी पोलीस नाईक सचिन अडबल,पो.कॉ.रणजित जाधव,जालिंदर माने,आकाश काळे,आदींचे पथक स्थापन करून त्या ठिकाणी पाळत ठेवली असता वरील आरोपी आढळून आला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तत्कालीन खा.स्व.शंकरराव काळें यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता.न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले तालुक्यातील (सु) प्रसिद्ध राजकीय दिवटे आदींनी या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून दिली असल्याचे धक्कादायक घटना उघड झाल्याची घटना फार जुनी नाही.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील मढी शिवारात उघड झाली आहे.

दरम्यान या बाबत जिल्हा गुन्हे शाखेस याबाबत गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली होती की,”कोपरगाव तालुक्यातील गोदावरी निधीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे.त्यानुसार पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांनी या ठिकाणी पोलीस नाईक सचिन अडबल,पो.कॉ.रणजित जाधव,जालिंदर माने,आकाश काळे,आदींचे पथक स्थापन करून त्या ठिकाणी पाळत ठेवली असता त्या ठिकाणी वरील वर्णनाचा एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व त्याच रंगाची ट्रॉली आढळून आली असून त्यात सदर पथकाने पाहणी केली असता त्यात अवैध वाळू वाहून नेताना आढळून आला आहे.त्यास त्याबाबत विचारणा केली असता त्याकडे कोणताही वाळूचा परवाना आढळून आला नाही.त्याने गणेश काटे व विकी सरोदे यांचे सांगणेवरून व ते त्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४५१/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,३४ सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close