जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात पुन्हा अतिक्रमणावर कोसळला हातोडा!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या प्रसिद्ध नोटीसीनुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यासंबंधीची अंतिम जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात  येऊन आज दुपारी 04 वाजेपर्यंत सुमारे 70 अतिक्रमणे हटवली होती उशिरा आलेल्या माहितींनुसार आज 150 अतिक्रमणे जमिनोध्वस्त केली असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.उद्याही मोहीम सुरू राहणार असून आगामी काळात यावर राजकारण होणार अशी चिन्हे दिसू लागली आहे.

कोपरगाव शहरात मुख्याधिकारी अजित निकत यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना.

दरम्यान यापूर्वी 10 मार्च 2011 रोजी कोपरगाव शहरातील सुमारे दोन हजार अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविले होते.त्यानंतर अनेकाना या शहरातून परागंदा व्हावे लागले होते.त्यामुळे त्यानंतर संपन्न झालेल्या नगरपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकात त्यांचे मोठे राजकारण झाले होते.अनेक नेत्यांनी खोटीनाटी भूमिपूजन करून आपल्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या भाकरी भाजल्या होत्या.त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव बसस्थानक आणि नगरपरिषदेसमोर व्यापारी गळे बांधून काही अंशी दिलासा दिला आहे.

   कोपरगाव शहरातील सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हा नागरिकांसाठी अत्यंत चिंतेचा आणि डोकेदुखीचा विषय ठरला आहे.रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती.परिणामी मुख्य बाजारपेठ आणि सार्वजनिक रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी व टपऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून आले होते.परिणामी पादचाऱ्यांची गैरसोय होत होती.त्यातच मोकाट जनावरांमुळे मागील सप्ताहात दोन नागरिकांचे बळी गेले असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला असल्याचे उघड झाले आहे.शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला झालेल्या अनधिकृत बांधकांमांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.सध्याच्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढत असल्याने या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.अनेक नागरिकांचे आणि प्रवाशांचे हकनाक बळी जात होते.या गंभीर समस्येची दखल घेत कोपरगाव नगरपरिषदेने ३ सप्टेंबर २०२६ पासून शहरात दोन दिवसांची धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.याला नगराध्यक्ष पराग संधान यांनी दुजोरा दिला आहे.

  

दरम्यान याबाबत मात्र ज्यांनी लाखो रुपयांची मोठी गुंतवणूक करून व्यापारी संकुलात गाळे बांधले त्या स्थायी व्यापाऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.कारण बऱ्याच वेळा अस्थायी दुकानदार स्थायी दुकानदारांसमोरच आपला प्रपंच मांडून आपला हजारो रुपयांचा व्यवसाय करत असून हा स्थायी व्यापाऱ्यावर मोठा अन्याय ठरत होता.त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान आणि प्रशासन अधिकारी अजित निकत यांचे आभार व्यक्त केले आहे.

  अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या प्रसिद्ध नोटीसीनुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यासंबंधीची अंतिम जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुसार ही नोटीस हीच अंतिम नोटीस समजली जाणार होती.त्यामुळे स्वतंत्र नोटीस दिली जाणार नव्हती.त्यानुसार आज ही कारवाई सकाळी 10.30 वाजता मुख्य रस्त्यावर गोदावरी नजीक असलेल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रापासून करण्यात आली होती.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सुमारे 140 कर्मचाऱ्यांचे दोन ग्रुप करण्यात आले होते.याशिवाय पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे 08 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.त्यात कोपरगाव येथील महात्मा गांधी चौकातील सुदेश टॉकीज समोर असलेल्या मनसेचे वाचनालय आणि अन्य दुकानांचा समावेश आहे.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक,विघ्नेश्वर चौक,गुरुद्वारा रोड,तहसील मैदान,इंदिरा पथ,बस स्थानक परिसर,मुख्य रस्ता,स्टेशन रोड,येवला रोड,कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील खडकी रोड,बैल रोड,संजयनगर आदि ठिकाणी दोन उत्खनक आणि दोन ट्रॅक्टर,एक हायवा आदींनी आपला हातोडा चालवला असून अनेक रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तर उद्या गांधीनगर परिसरातील एस.जी.रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निकत यांनी दिली आहे.

   दरम्यान यापूर्वी 10 मार्च 2011 रोजी कोपरगाव शहरातील सुमारे दोन हजार अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविले होते.त्यानंतर अनेकाना या शहरातून परागंदा व्हावे लागले होते.त्यामुळे त्यानंतर संपन्न झालेल्या नगरपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकात त्यांचे मोठे राजकारण झाले होते.अनेक नेत्यांनी खोटीनाटी भूमिपूजन करून आपल्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या भाकरी भाजल्या होत्या.त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव बसस्थानक आणि नगरपरिषदेसमोर व्यापारी गळे बांधून काही अंशी दिलासा दिला आहे.तर फ्रुट मार्केट मात्र अपयशी ठरले आहे.त्याचे अवाजवी दर कोणालाही परवडणारे ठरले नव्हते.आज हीच मंडळी सत्तेत असून आता आगामी काळात याबाबत सदर विस्थापित नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   दरम्यान याबाबत मात्र ज्यांनी लाखो रुपयांची मोठी गुंतवणूक करून व्यापारी संकुलात गाळे बांधले त्या स्थायी व्यापाऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.कारण बऱ्याच वेळा अस्थायी दुकानदार स्थायी दुकानदारांसमोरच आपला प्रपंच मांडून आपला हजारो रुपयांचा व्यवसाय करत असून हा स्थायी व्यापाऱ्यावर मोठा अन्याय ठरत होता.त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान आणि प्रशासन अधिकारी अजित निकत यांचे आभार व्यक्त केले आहे.तर राष्ट्रवादीने मात्र आगामी काळात सणासुदीचे दिवस आले असून अस्थायी दुकानदारांना मागे बसून त्यांना व्यवसाय करून द्यावा अशी मागणी कालच गौतम बँके सभागृहात केली आहे.त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगू शकतो असा कयास व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरात मुख्याधिकारी अजित निकत यांचे प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण मोहीम सुरू असताना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी ठेवलेला चोख बंदोबस्त दिसत आहे.

  दरम्यान दुसरीकडे कोपरगाव मालेगाव रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याने आज आ.आशुतोष काळे यांची भेट घेऊन सदर राष्ट्रीय महामार्गाला बाह्यवळण योजना बनवावी अशी मागणी करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.तर काहींनी उड्डाण पूल करावी अशी मागणी केली आहे.त्यामुळे कोपरगाव मालेगाव रस्ता परिसरातील व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close