जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर वक्रदृष्टी,तीन जणांवर गुन्हा 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात गोदावरी तीरावर मनाई वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू निर्माण होत असल्याची गुप्त माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाल्यावरुन त्यांनी केलेल्या धडक कारवाईत मंदाबाई बळीराम आहेर,मनीषा संतोष सोनवणे,भाऊराव सोमनाथ पवार  व नानासाहेब कारभारी गायकवाड आदी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी महिला पोलीस कॉ.सुनंदा धराडे यांच्या फिर्यादी वरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील सुमारे ८७ हजार रुपयांचा अवैध दारू निर्माण करण्यासाठी लागणारा ऐवज जप्त करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात वैध व्यावसायिकांनी उपद्रव वाढविल्याने याबाबत पोलीस अधिकारी आगामी गणोशोत्सव लक्षात घेऊन सतर्क झाले असून त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी एक पथक स्थापन करून त्यात पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस हे.कॉ.गणेश काकडे,पो.कॉ.संभाजी शिंदे,यमनाजी सुंबे,महिला पोलीस कॉ.सुनंदा धराडे आदींचा समावेश करून संशयित ठिकाणी धाड टाकली असता त्यांना संवत्सर शिवारात मनाई वस्ती या ठिकाणी चार जणांवर कारवाई केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात वैध व्यावसायिकांनी आपल्या मोठया प्रमाणावर पथाऱ्या पसरल्या असून याबाबत पोलीस अधिकारी आगामी गणोशोत्सव लक्षात घेऊन सतर्क झाले आहे.त्यामुळे त्यांनी धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या नूसार त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी एक पथक स्थापन करून त्यात पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस हे.कॉ.गणेश काकडे,पो.कॉ.संभाजी शिंदे,यमनाजी सुंबे,महिला पोलीस कॉ.सुनंदा धराडे आदींचा समावेश करून संशयित ठिकाणी धाड टाकली असता त्यांना संवत्सर शिवारात मनाई वस्ती या ठिकाणी गोदावरी काठी असललेल्या नारंदा नदी काठी काटवनात तीन ठिकाणी त्या ठिकाणी मंदाबाई बळीराम आहेर (वय-४२) हि अवैध दारू निर्माण करण्याचे काम करत असल्याचे आढळून आले आहे.त्यात टाकलेल्या धाडीत ३२ हजार रुपये किमतीचे ३२० लिटर कच्चे रसायन मिळून आले आहे. ते त्या ठिकाणी पंचासमक्ष नष्ट केले आहे.

दरम्यान त्याच परिसरात पोलिसांना अन्य एक ठिकाणी मनीषा संतोष सोनवणे हि महिला अवैध दारू निर्माण करताना आढळून आली आहे.तिच्या ताब्यातील दारू बनविण्याचे  सुमारे २५ हजार रुपयांचे २५० लिटर कच्चे रसायन मिळून आले आहे.

या शिवाय नारंदी नदीच्या काठी अन्य दोन आरोपी भाऊराव सोमनाथ पवार (वय-३६),रा.मारुती मंदिराजवळ मनाई वस्ती,नानासाहेब कारभारी गायकवाड आदी दोघांजवळ सुमारे ३० हजार किंमतीचे ३०० लिटर दारू निर्मितीचे कच्चे रसायन आढळून आले आहे.त्याचाही पंचासमक्ष नाश केला असल्याचे माहिती पोलीस अधिकांऱ्यानी दिली आहे.दरम्यान या कारवाईचे कोपरगाव शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

दरम्यान या तीन आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा अनुक्रमे क्रं.४४८,४४९,४५०/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close