जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या ठिकाणी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   कोपरगाव विधानसभा मतदासंघाचे माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व गर्जे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक व घसा संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला बहुसंख्य नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

 

“नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेऊन कान,नाक व घसा आणि इतर आजारांच्या बाबतीतही जागरूक राहावे जेणेकरून मोठ्या आजाराचा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासण्या कराव्या आणि शरीराची काळजी घ्यावी”माजी आ.अशोक काळे,कोपरगाव.

  या शिबिराचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मवीर शंकरराव काळे सहकार सभागृहात पार पडले.यावेळी ते म्हणाले की,कान,नाक आणि घसा हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अवयव असून दैनंदिन जीवनातील अनेक संवेदनशील क्रियांशी त्यांचा थेट संबंध आहे.त्यामुळे या अवयवांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.किरकोळ त्रास वाटत असला तरी तो वारंवार होत असल्यास वेळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे.योग्य वेळी आजारांचे निदान आणि उपचार झाल्यास गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.यासाठी ही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   सदर प्रसंगी डॉ.अजय गर्जे,डॉ.वरद गर्जे,डॉ.नकुल गर्जे,डॉ.दिनेश पानगव्हाणे,डॉ.दत्तात्रय कोळपे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,प्रशांत घुले,विष्णु शिंदे,कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बी.बी.सय्यद,सहाय्यक सचिव संदिप शिरसाठ, कारखाना आरोग्य अधिकारी डॉ.शैलेश जैन,मुख्य लेखा अधिकारी वैभव काळे,मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ञ सुर्यकांत ताकवणे,कामगार अधिकारी दिपक निंबाळकर, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी,कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

   माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत कान,नाक,घसा तपासणी शिबिराचे केलेले आयोजन कौतुकास्पद बाब आहे. गरजू नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेऊन कान,नाक व घसा आणि इतर आजारांच्या बाबतीतही जागरूक राहावे जेणेकरून मोठ्या आजाराचा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासण्या कराव्या आणि शरीराची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच उपयुक्त वैद्यकीय सल्ला मिळाल्याने रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.

यावेळी कान,नाक व घसा तज्ज्ञ डॉ.पूजा वरद गर्जे व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून कान,नाक व घसा संबंधित विविध आजारांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन केले.या शिबीराचा परिसरातील नागरिक,महिला,विद्यार्थी,कामगार,आणि ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लाभधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close