जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

खोटी साक्ष भोवली,आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  भारतीय न्यायव्यवस्थेत साक्षीदार उलटणे ही बाब नवी नाही.प्रलोभन हा महत्वाचा घटक असून त्यातून अनेकांनी आपल्या साक्षी बदलून आपले चांगभले केले असून त्यातच हे प्रकार काहींच्या अंगलट आले असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव येथील न्यायालयात अशीच एक घटना उघडकीस आली असून राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील रहिवासी साक्षीदार
शंकर वैद्य याला न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि 15 हजारांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे खोट्या साक्षी देणाऱ्या अपप्रवृत्तीस चांगलाच चाप बसण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान यातील प्रथम गुन्ह्यातील फिर्यादी या खटल्यातील आरोपी शंकर वैद्य याने जबाबात विसंगतीके केल्याने कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्यानं घेतले होते.परिणामी ग्रामसेवक यांचे प्रतिष्ठेला हानी पोहचवली असल्याचे दिसून आले होते.परिणामी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या खटल्यातील फिर्यादी आणि दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी वैद्य यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन अधीक्षक भारतसिंग परदेशी यांना दिले होते.त्याची सुनावणी होऊन ही शिक्षा दिली आहे.

  न्यायालयात साक्षीदार साक्षीपासून उलटणे आणि स्वतःची साक्ष बदलणे हे भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील एक मोठे आणि चिंताजनक आव्हान आहे.यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटते आणि सामान्यांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होत आहे.आरोपी किंवा त्यांच्या समर्थकांकडून साक्षीदाराला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात.तर काही प्रभावशाली आरोपी साक्षीदारांना साक्ष बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचे आमिष दाखवतात.त्यातच काही खटले वर्षानुवर्षे चालतात.प्रदीर्घ काळामुळे साक्षीदार मानसिकदृष्ट्या थकतात किंवा मूळ घटना विसरतात.भारतात पोलीस तपासा दरम्यान आणि न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदारांना पुरेशी सुरक्षा मिळत नाही.अनेकदा पोलिसांनी नोंदवलेली प्राथमिक विधाने त्रुटींनी भरलेली असतात,ज्याचा फायदा आरोपीचे वकील न्यायालयात घेतात.साक्षीदार उलटल्यामुळे गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी पुराव्याअभावी सुटतात,ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढते. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे,त्यांना हक्काचा न्याय मिळत नाही.पोलीस आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ आणि जनतेचा पैसा वाया जात असल्याचे उघड होत आहे.तर काही घटनात मात्र खोटी साक्ष चांगलीच अंगलट असल्याचे उघडकीस होत असून अशीच एक घटना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात उघडकीस आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”यातील राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील रहिवासी आरोपी शंकर वैद्य हा डोहाळे येथील रहिवासी आहे.त्याला सन-2015 साली आपल्या वडिलांचे नावाने घरकुल मंजूर झाले होते.त्या घरकुलाचे त्याला दोन हप्ते मंजूर झाले होते.तर शेवटचा हप्ता मात्र मिळणार होता.त्याबाबत डोहाळे येथील ग्रामसेवक भालेराव याने त्यांचेकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती.परिणामी संतापून त्या खटल्यातील फिर्यादी इसम शंकर वैद्य याने अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून त्यात ग्रामसेवक भालेराव याला अडकवले होते.परिणामी त्यात ग्रामसेवक याला अटक झाली होती.त्यांचे विरुद्ध रीतसर न्यायालयात खटला दाखल झाला होता.त्याबाबत कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी संपन्न झाली होती.त्यात या फिर्यादीने व या खटल्यातील आरोपीने आपल्याला वडिलामार्फत हातोहात दोन हप्ते दिले असल्याचे मान्य केले होते.या शिवाय सदर प्रस्तावाची प्रत मिळाली असल्याचे मान्य केले होते.त्याने याबाबत पंचायत समितीला पत्र देऊन,” आपण प्रस्ताव वेळेत सादर न केल्याचे मान्य करून परिणामी आपल्याला हप्ता वेळेत मिळाला नाही” अशी कबुली दिली होती.हे करताना आपल्याला ग्रामसेवक याने उसने 03 (तीन) हजार रुपये दिले असल्याचे खोटे सांगून शंकर वैद्य आपल्याच जाळ्यात अडकला होता.व तीच रक्कम ग्रामसेवक आपल्याकडे मागत असल्याचे सांगितले होते.त्यामुळे ज्यावेळी लाचलुचपत विभागाची धाड झाली आणि आपल्याकडून तीन हजारांची लाच घेतली असल्याचे प्रयोजनच कोसळले होते.

   दरम्यान यातील जबाबात विसंगती आल्याने कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे हे प्रकरण गांभीर्यानं घेतले होते.परिणामी ग्रामसेवक यांचे प्रतिष्ठेला हानी पोहचवली असल्याचे दिसून आले आणि निष्पन्न होते.परिणामी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या खटल्यातील फिर्यादी आणि दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी वैद्य यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन अधीक्षक भारतसिंग परदेशी यांना दिले होते.त्या खटल्याची सुनावणी नुकतीच कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी खैरनार यांचे न्यायालयात संपन्न झाली असून यात आरोपी शंकर वैद्य हा दोषी आढळून आला आहे.त्यात न्यायालयाने त्याला तीन वर्षाची सश्रम कारावासाची आणि 15 हजारांचा दंडाची सुनावणी केली आहे.दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास आणखी चार महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान याबाबत माहिती देताना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातील सरकारी वकील प्रदीप रणधीर यांनी सांगितले की,”कोणी साक्ष फिरवताना दबाव आणत असेल आणि आर्थिक प्रलोभन दाखवत असेल तर धमकावत असेल तर तुम्ही संबंधित सरकारी वकिलांशी संपर्क साधावा असे आवाहन सरकारी वकील रणधीर यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close