शैक्षणिक
…या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत,कौशल्य विकास मंत्रालय आणि उदयोजकता महासंचालनालय नवी दिल्ली डायरेक्टोरेट जनरल ट्रेनिंग यांचेमार्फत घेणेत आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा जुलै-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व एन.सी.व्ही.टी.प्रमाणपत्र देऊन संस्थेत प्रत्येक व्यवसायातुन प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करणेत आला आहे.

“जगभरातून येणारे भाविक भक्त बाबांच्या दान पेटीत दान अर्पण करतात,त्यातला काही भाग आपल्या प्रशिक्षणासाठी उपयोगी येत असल्याने त्याचा आपण आपले प्रशिक्षणात व जीवनात सदुपयोग करुन घ्यावा.राज्यात व देशात यापूर्वीचे प्रशिक्षणार्थ्यां प्रमाणेच आपले नाव उंचावून संस्थेचा व साईबाबा संस्थानचा नाव लौकीक उंचवावा”-तुकाराम हुळवले,उपमुख्य अधीकारी साईबाबा संस्थान शिर्डी.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधतांना,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून दिल्या जाणा-या प्रशिक्षणाच्या संधीचे सोने करुन घ्यावे.आपण सर्व कमी कालावधीत तांत्रिक प्रशिक्षण घेत असल्याने जीवनात ख-या अर्थाने यशस्वी होण्यासाठी स्वकष्टाने अधिक कौशल्य प्राप्त करणे महत्त्वाचे आहे.आपण सर्व प्रशिक्षणार्थी भाग्यवान आहात की आपणास श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेला आहे.जगभरातून येणारे भाविक भक्त बाबांच्या दान पेटीत दान अर्पण करतात,त्यातला काही भाग आपल्या प्रशिक्षणासाठी उपयोगी येत असल्याने त्याचा आपण आपले प्रशिक्षणात व जीवनात सदुपयोग करुन घ्यावा.राज्यात व देशात यापूर्वीचे प्रशिक्षणार्थ्यां प्रमाणेच आपले नाव उंचावून संस्थेचा व साईबाबा संस्थानचा नाव लौकीक उंचवावा असे आवाहन करून श्री साईबाबांचा श्रध्दा व सबुरीचा संदेश आचरणात आणल्यास यशाचे शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

युवक युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ०७ वा राहाता तालुक्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची ‘पी.एम.स्कील रन’ ही दौड शासकीय औ.प्र.संस्था,राहाता येथून ५ कि.मी.पर्यंत आयोजित करणेत आली होती.यामध्ये संस्थेतील कोपा व टुल अॅण्ड डायमेकर या व्यवसायातील ०२ प्रशिक्षणार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला असल्याने त्यांना शासनामार्फत अनुक्रमे रु. २००० व रु.१००० रक्कम व डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.त्यांचा ही मुख्य अतिथी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यान या संस्थेतील सुयश संपादन केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी.शिवा शंकर यांनी अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचे हस्ते श्रींची पुजा,दिप प्रज्वलन करुन राज्यगीताने करणेत आली.प्रमुख अतिथींचा परिचय संस्थेचे गटनिदेशक श्री चौधरी यांनी करुन दिला.
सदर प्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री दुनाखे यांनी प्रास्ताविक केले.तर पालक प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निदेशक व्ही.बी.पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी सर्व निदेशक,प्रशिक्षणार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे गटनिदेशक श्री जांभूळकर यांनी आभार मानले आहे.