जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

वानरांच्या उच्छादामुळे शेतकरी त्रस्त?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)


  कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील वाघ वस्ती परिसरात बिबट्यानंतर आता वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून,शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान खरीप पिकांचे नुकसान करणाऱ्या या वानरांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी शेतात गेले असता,वानरे अंगावर धावून येत असल्याचा अनुभव स्थानिकांनी सांगितला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.अखेर शेतकऱ्यांना स्वतःचा बचाव करत फटाके फोडावे लागले आणि वन्यजीवांचे हुसकावून लावणारे आवाज काढावे लागत आहेत.

वानरांच्या उपद्रवामुळे सांगवी भुसार आणि परिसरात शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत.शेतात उभी असलेली पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.शेतात उभी असलेली पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.वर्तमान काळात खरीप पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या असताना आता वानरांचा मर्केटलीला सुरू झाल्या असल्याची माहिती हाती आली आहे.सांगवी फाटा परिसरातील वाघ वस्तीवर या वानरांनी मुगाच्या शेतात थेट मुक्काम मांडला आहे.परिपक्व होत असलेल्या मुगाच्या शेंगा वानरांकडून फस्त केल्या जात असल्याचे चित्र आहे.दिवसाढवळ्या पिकांवर ताव मारल्यानंतर ही वानरे शेजारील कवठाच्या झाडावर आरामात बसत असल्याचे चित्र दिसत आहे.पिकांचे होणारे हे नुकसान पाहून शेतकरी हतबल झाले आहेत.

  विशेष म्हणजे,पिकांचे नुकसान करणाऱ्या या वानरांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी शेतात गेले असता,वानरे अंगावर धावून येत असल्याचा अनुभव स्थानिकांनी सांगितला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.अखेर शेतकऱ्यांना स्वतःचा बचाव करत फटाके फोडावे लागले आणि वन्यजीवांचे हुसकावून लावणारे आवाज मोबाईलवर उच्च आवाजात लावावे लागले असल्याचे दिसून येत आहे.त्यानंतर या वानरांनी तिथून पलायन केले असल्याचे दिसून आले आहे.

  वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची गरज
परिसरात रानडुक्कर,हरीण आणि बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी आधीच त्रस्त होते,त्यात आता वानरांच्या या नव्या संकटामुळे शेती करणे कठीण झाले आहे.या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे ऐन पिकांच्या काढणीच्या वेळी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.त्यामुळे संबंधित वन विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन सांगवी भुसार परिसरात बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना या त्रासातून मुक्त करावे,अशी आक्रमक मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.आता वन विभाग काय उपाययोजना करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close