गुन्हे विषयक
वाळूचोरांवर मोठी कारवाई,१६ लाखांचा अवैज जप्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पूर्व वाहिनी गोदावरी नदी वाळूचोराची उजाड करून टाकले असून अजूनही ते थांबण्यास तयार असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत एकूण पाच ट्रॅक्टर्स सह १६ लाख ०५ हजाराचा अवैज कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विशाल ठकीनाथ लव्हाटे यांच्या मुसक्या आवळल्या असून अन्य चार ट्रॅक्टरवरील आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे वाळूचोरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा अत्यंत चिंताजनक बनला आहे.मळेगाव थडी,सांगावी भुसार,मायगाव देवी,सोनारी,कुंभारी,आणि सुरेगाव परिसरामध्ये महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करत असले,तरीही रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरट्या उपशामुळे नदीचे पात्र उद्ध्वस्त होत आहे.परिणामी नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे.जलचर आणि नदीकाठच्या परिसराचे मोठे नुकसान होत आहे.शिवाय वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत.पण वाळूचोरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही हे विशेष !
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा अत्यंत चिंताजनक बनला आहे.मळेगाव थडी,सांगावी भुसार,मायगाव देवी,सोनारी,कुंभारी,आणि सुरेगाव परिसरामध्ये महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करत असले,तरीही रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरट्या उपशामुळे नदीचे पात्र उद्ध्वस्त होत आहे.परिणामी नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे.जलचर आणि नदीकाठच्या परिसराचे मोठे नुकसान होत आहे.शिवाय वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत.प्रशासकीय कारवाई महसूल विभाग आणि पोलिसांनी वेळोवेळी धाडी टाकून ट्रॅक्टर,हुक व इतर साहित्य जप्त केले आहे.अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,परंतु दंडात्मक कारवाईनंतरही उपसा पूर्णपणे थांबलेला नाही.सुरेगाव शिवारात तेथील कार्यकर्ते खबर देऊनही संबंधित यंत्रणा कारवाई करत नाही असा त्यांचा निराशाजनक अनुभव आहे.परिणामी पोलिस आणि महसूल प्रशासन हातची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका घेताना ग्रामस्थांना आढळून येतआहे.त्यामुळे बऱ्याच वेळा जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी आपली पथके पाठवून कारवाई करताना दिसून येत आहे.अशीच कारवाई काल रात्रीच्या सुमारास झाली असून यात डाऊच खुर्द शिवारात शिर्डी येथील पथकाला गुप्त खंबर मिळाल्याने त्यांनी आपले पथक घटनास्थळी पाठवले होते.त्याठिकाणी त्यांना एकूण पाच ट्रॅक्टर वाळू चोर करताना आढळून आले होते.

दरम्यान जप्त केलेल्यां वाहनांत एक ५ लाख ०५ हजार रुपये किमतीचा एक विना नंबरचा निळ्या रंगाचा स्वराज ७३५ कंपनीचा ट्रॅक्टर,त्याचा चेसिस नंबर-९६३६८२४३९ असा असून त्यास लाल रंगाची ट्रॉली तिचा क्रमांक एम.एच.२० ए.वाय. ७०७९ असा आहे.त्यात अंदाजे ५हजार रुपये किमतीची एक ब्रास शासकिय गौण खनिज वाळु असलेली आरोपी विशाल लव्हाटे याचे ताब्यात मिळाली आहे.तर अन्य ३ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा भगव्या रंगाचा स्वराज ७४४ एफ.ई.मॉडेल या कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा चेसिस नंबर डब्ल्यू.डब्ल्यू.सी. इ.-४०६०००३८९३६ असा असलेला,३,लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा भगव्या रंगाचा स्वराज ७४४ एफ.ई.कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा चेसिस नंबर डब्ल्यू.डब्ल्यू.सी. ए.-४०६०६०३४२१२ असा असलेला,याशिवाय ३ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा निळया रंगाचा स्वराज ७४४ एफ.ई.कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा चेसिस नंबर क्यू.एस. टी.डी.-४०६०६००९००० असा असलेला,तर २ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा फिकट लाल रंगाचा स्वराज ८५५ कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा चेसिस नंबर-८५३२००२६ व इंजिन नंबर ४७१२३७-९५३०९०४ असा असलेला असे एकूण पाच ट्रॅक्टर आढळून आले आहे.त्यांचा एकूण जप्त केलेला ऐवज १६ लाख ०५ रुपयांचा असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर जाधव आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी पो.हे.कॉ.अशोक रामा शिंदे यांच्या फिर्यादीवरून आपल्या दप्तरी गुन्हा क्र.भारतीय न्याय संहिता कलम 303 (2)3,(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत.



