जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव-मालेगाव अतिक्रमण विषय ऐरणीवर,व्यापारी धास्तावले !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव-मालेगाव या राष्ट्रीय महामार्गाला उड्डाणपूल आणि शिर्डी आणि झगडेफाटा वडगाव पान आदी बाह्यवळण रस्ता असा पर्याय असून व्यापाऱ्यांनी तो निवडायचा असून आपण तुमच्या भावना केंद्रीय मंत्र्यांसह शासनाकडे पोहचविण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी आज एका बैठकीत बोलताना केले आहे.

कोपरगाव-मालेगाव रस्ता रुंदीकरण प्रश्नासाठी उपस्थित व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेताना आ.काळे दिसत आहेत.

“धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कन्नड घाटामुळे या मार्गाने जात आहे.त्यातच आपल्याकडे देवस्थाने,शिक्षण संस्था,कारखाने असल्याने यावर कायम गर्दी असते.राज्य शासनाने हा रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला आहे.ठेकेदाराचे पैसे केंद्राला द्यायला लावले आहे.कोपरगाव सावळीविहिर हा मार्ग अंतिम टप्प्यात आहे.मात्र पुढील रस्ता सहा पदरी होणार आहे.टाकळी नाका ते पुणतांबा फाटा या पर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित आहे.मात्र व्यापाऱ्यांच्या अडचणी आपण केंद्र सरकारकडे नक्कीच पोहचून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   कोपरगाव शहरातून सुरू होणारा हा रस्ता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख महामार्ग मानला जात आहे.या रस्त्याला कोपरगाव,येवला शहरात व्यापाऱ्यांची दुकाने आणि बाजारपेठ आहे.या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास होत असतो.शहरातील नागरिकांसह विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडण्याची वेळ येते.या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकदा नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाने कोपरगाव-मालेगांव राष्ट्रीय महामार्ग यासाठी ९८० कोटींची तरतूद केंद्र सरकारने गत वर्षी डिसेंबर २०२५ मध्ये केली असून त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी या विभागाने अतिक्रमण मोहिमेविरुद्ध पंधरदिवसापूर्वी सर्वेक्षण केले असल्याने त्याविरुद्ध कोपरगाव येवला मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यापारी एकवटले आणि धास्तावले असून त्यांनी आज दुपारी ०४ वाजता कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर मांडल्या आहेत.

कोपरगाव मालेगाव रस्ता रुंदीकरण प्रश्नासाठी उपस्थित व्यापारी दिसत आहेत.

  यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन गवारे यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने समस्या मांडल्या आहेत.त्यांना टाइल्स चे संचालक पटेल यांनी दुजोरा दिला आहे.

  सदर प्रसंगी माजी गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,सोमनाथ आढाव,रांजेंद्र वाघचौरे,आदींसह बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”हा रस्ता पूर्वी राज्य सरकारकडे होता.आता तो राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला ah.त्याला महामार्ग ७५२ जी असा क्रमांक दिला असून हा मध्यप्रदेशातील सेंधवा पर्यंत आहे.या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे.धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक या मार्गाने जात आहे.त्यातच आपल्याकडे देवस्थाने,शिक्षण संस्था,कारखाने असल्याने यावर कायम गर्दी असते.राज्य शासनाने हा रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला आहे.ठेकेदाराचे पैसे केंद्राला द्यायला लावले आहे.कोपरगाव सावळीविहिर हा मार्ग अंतिम टप्प्यात आहे.मात्र पुढील रस्ता सहा पदरी होणार आहे.टाकळी नाका ते पुणतांबा फाटा या पर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित आहे.दिनाक ११ ऑगस्टला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यास गेलो होतो.कोपरगाव शहराच्या बाह्यवळण रस्ते चार विचाराधीन आहे.त्यात व्यापाऱ्यांनी बाह्य वळण योजना आणि उड्डाणपूल या दोन्ही पर्यायांना आधी संमती दिली पण नंतर नंतर बाह्यवळण रस्त्याला संमती दर्शवली आहे.
त्यानंतरही मतमतांतरे दिसून आले आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव मनमाड मार्गावरील व्यापारी यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे.यावेळी उपस्थितांचे आभार मंदार पहाडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close