गुन्हे विषयक
गंभीर गुन्ह्यातील आणखी एक आरोपी जेरबंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कार्तिक निकम याला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली असताना पुन्हा एक कारवाई समोर आली असून त्यात सुरेगाव येथील आरोपी लक्ष्मण शरद पिंपळे (वय-२२ वर्षे) याला अटक केली आहे.याबाबत तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर गुन्ह्यातील अन्य आरोपी संदिप दादा काळे यास यापूर्वी अटक करण्यात आलेली असून,गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे.पुढील तपास अटक आरोपी लक्ष्मण पिंपळे याच्याकडून त्याच्या गुन्ह्यातील नेमक्या भूमिकेबाबत,गुन्ह्यानंतरच्या हालचालींबाबत तसेच गुन्ह्यातील इतर फरार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत तपास करण्यात येत आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात घरफोडी,दुकानफोडी,चेन स्नॅचिंग आणि नाटेगावसारख्या भागात धाडसी दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.याशिवाय अवैध दारूविक्री,जुगार आणि वाळू उपशासारखे अवैध व्यवसाय देखील वाढले असून,नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या चोऱ्याही होत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या गस्ती पथकांवर जबाबदारी वाढवली आहे.परिणामी त्यांची तालुक्यातील गावात रात्रीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.त्याचे आता चांगले परिणाम समोर येताना दिसून येत आहे.याबाबत महेगाव देशमुख येथून कार्तिक निकम याला अटक केली असताना काल पोलिसांनी आणखी एक आरोपी शरद पिंपळे याला सुरेगाव येथून जेरबंद केले आहे.तो दि.१८ ऑगस्ट २०२६ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरेगाव येथे झालेल्या गंभीर मारहाण व चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यातील सुमारे १० महिन्यांपासून फरार होता.

कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलून प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अधिक काम करावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सदर प्रकरणी गु.र.नं.२९७/२०२५,भारतीय न्याय संहिता कलम १०९,११५(२),३५२,३५१(२),३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण शरद पिंपळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता परंतु तो अटक चुकविण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी ओळख लपवुन राहत होता.दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी सुरेगाव परिसरात लपलेला असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तपास पथकाने तात्काळ कार्यवाही करून त्याचा शोध घेतला होता.आरोपी मिळून आल्यानंतर त्यास गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेऊन मध्यरात्री अटक करून चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील अन्य आरोपी संदिप दादा काळे यास यापूर्वी अटक करण्यात आलेली असून,गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे.पुढील तपास अटक आरोपी लक्ष्मण पिंपळे याच्याकडून त्याच्या गुन्ह्यातील नेमक्या भूमिकेबाबत,गुन्ह्यानंतरच्या हालचालींबाबत तसेच गुन्ह्यातील इतर फरार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत तपास करण्यात येत आहे.आरोपीने गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे,फरारी कालावधीतील त्याच्या हालचाली व संपर्काची पडताळणी करणे याशिवाय इतर फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून,अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा दोष न्यायालयीन निर्णयानंतरच निश्चित होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर गुन्ह्यातील अन्य आरोपी संदिप दादा काळे यास यापूर्वी अटक करण्यात आलेली असून,गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे.पुढील तपास अटक आरोपी लक्ष्मण पिंपळे याच्याकडून त्याच्या गुन्ह्यातील नेमक्या भूमिकेबाबत,गुन्ह्यानंतरच्या हालचालींबाबत तसेच गुन्ह्यातील इतर फरार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत तपास करण्यात येत आहे.आरोपीने गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे,फरारी कालावधीतील त्याच्या हालचाली व संपर्काची पडताळणी करणे तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेणे या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती,कोपरगांव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे,पो.कॉ.अमोल घनवट,चालक अनिल फाळके यांनी केली आहे.पुढील गुन्हयाचा पूढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.



